मालिकेतल्या एका सीनसाठी मराठमोळी अभिनेत्री उतरली चिखलात; 3 तास राहिली दलदलीत

जवळपास तीन तास या सीनचं शूट सुरू होतं. संपूर्ण टीमच्या मेहनतीचं हे फळ आहे असं अभिनेत्री गिरीजा म्हणाली. हा सीन प्रेक्षकांना 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेत रात्री 8 वाजता स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळेल.

| Updated on: May 20, 2025 | 12:54 PM
1 / 6
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. लाँचच्या पहिल्याच आठवड्यात 6.7 टीआरपी मिळवत मालिकेची धमाकेदार सुरुवात झाली. आता लवकरच या मालिकेत एक रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे.

स्टार प्रवाह वाहिनीवरील 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या मालिकेला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. लाँचच्या पहिल्याच आठवड्यात 6.7 टीआरपी मिळवत मालिकेची धमाकेदार सुरुवात झाली. आता लवकरच या मालिकेत एक रोमांचक वळण पाहायला मिळणार आहे.

2 / 6

कावेरी आणि उदयच्या अपघातानंतर चिमुकल्या चिकूला घेऊन कावेरी धर्माधिकारींच्या घरी येते. मात्र सुलक्षणा तिचा स्वीकार करत नाही.

3 / 6

घरात स्थान हवं असेल तर मंदिराजवळ असलेल्या तलावातून कमळ आणण्यासाठी तिला सांगण्यात येतं. त्या तलावात उतरणं म्हणजे साक्षात मृत्यूला कवटाळण्यासमान आहे.

4 / 6

मात्र कावेरी हे आव्हान स्वीकारते आणि तलावत उतरते. कावेरीचा जीव वाचणार का हे प्रेक्षकांना मालिकेच्या पुढील भागांमधून कळेल.

5 / 6

अभिनेत्री गिरीजा प्रभूसाठी हा सीन साकारणं आव्हानात्मक होतं. साडी नेसून तलावात उतरणं म्हणजे तारेवरची कसरत होती. बॉडी डबल न वापरता गिरीजाने हा सीन पूर्ण केला आहे.

6 / 6

कुडाळ इथल्या वालावल मंदिराजवळच्या तलावात हा सीन शूट करण्यात आला आहे. दलदल आणि कमळांचं पसरलेलं जाळं यामध्ये शूट करणं जोखमीचं होतं. मात्र मालिकेच्या संपूर्ण टीमच्या मदतीने गिरीजाने यशस्वीरित्या हा सीन पूर्ण केला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us