
उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तरुणीने अवघ्या तीन वर्षांत 15 पेक्षा अधिकवेळा लग्न केलं आहे. सोबतच 6 वेळा तिने निकाहही केला आहे. विशेष म्हणजे या लुटणाऱ्या नौरीसोबत लग्न लावून देण्यासाठी पंडित, मौलवी आणि बनावट आई-वडीलही असायचे.

लग्न केल्यानंतर ही तरुणी तिच्या सासरी जायची आणि मधुचंद्राच्या अगोदरच घरातील सगळे दागिने, पैसे, रोकड घेऊन पळून जायची.

या टोळीने राजस्थान, मध्यप्रदेश, हरियाणा यासारख्यार राज्यांमध्येही अनेकांना अशा प्रकारे लुटलेलं आहे. लग्नासाठी उपवर वधूचा शोध घेणाऱ्या मुलांना ही टोळी जाळ्यात फसवाायची.

राजस्थानमधील अलवर येथील एका तरुणाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घनश्याम नगर येथील रेल्वे स्टेशनजवळ या फसवणूक करणाऱ्या तरुणीला अटक केलं. या तरुणीचं नाव शहाना असं आहे.

पोलिसांनी तिच्या सगळ्या टोळीला अटक केले आहे. लूट करण्याच्या या धक्कादायक प्रकारामुळे सगळीकडे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.