
शाकाहारी लोकांचे प्रमाण : पाकिस्तानमध्ये पूर्णपणे शाकाहारी असणाऱ्या लोकांचे प्रमाण खूप कमी आहे. विविध आंतरराष्ट्रीय अहवालांनुसार, पाकिस्तानची केवळ 1.2 % ते 2% लोकसंख्या पूर्णपणे शाकाहारी आहे.

आर्थिक कारणे : पाकिस्तानमधील शाकाहाराचे मुख्य कारण धार्मिक नसून आर्थिक आहे. गेल्या काही वर्षांत तिथे महागाई आणि मांसाच्या किमती प्रचंड वाढल्यामुळे, अनेक मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांनी भाज्या आणि डाळींकडे आपला मोर्चा वळवला आहे.

डाळी आणि भाज्या : पाकिस्तानी लोक स्वतःला शाकाहारी म्हणवून घेत नसले, तरी त्यांच्या रोजच्या जेवणात डाळी आणि भाज्या यांचा मोठा वाटा असतो. बटाटे, कांदा आणि टॉमॅटो या तिथल्या सर्वात लोकप्रिय भाज्या आहेत.ॉ

आरोग्य : पाकिस्तानातील शहरी तरुण पिढीमध्ये आता फिट राहण्यासाठी आणि आजारांपासून दूर राहण्यासाठी 'शाकाहारी डाएट' घेत आहेत. लाहोर, कराची आणि इस्लामाबाद यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये आता 'वेगन' लोकांची संख्या हळूहळू वाढत आहे.

हिंदू अल्पसंख्याक समुदाय : पाकिस्तानमधील हिंदू समुदाय जो प्रामुख्याने सिंध प्रांतात राहतो, हा तिथला मोठा शाकाहारी गट आहे. धार्मिक कारणांमुळे हा समुदाय पूर्णतः किंवा अंशतः शाकाहारी आहे.