
सर्वात जास्त नद्या असलेला देश : बांग्लादेश हा सर्वात जास्त नद्या असलेला देश आहे. जिथे 50, 100 किंवा 200 नव्हे तर 700 पेक्षा जास्त नद्या आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात नद्या असल्यामुळे बांगलादेशला नद्यांचा देश असेही म्हटले जाते.

प्रमुख नद्या : बांगलादेशातील प्रमुख नद्यांमध्ये ब्रह्मपुत्र, रायडक, सुमा, गंगा, मेघना, कर्णफुली, तीस्ता, बंशी आणि अत्री या प्रमुख नद्यांचा समावेश आहे. या नद्यांच्या अनेक उपनद्याही बांगलादेशमध्ये आहेत.

बांगलादेशमध्ये 57 आंतरराष्ट्रीय नद्या : बांगलादेशमध्ये 57 आंतरराष्ट्रीय नद्या आहेत. यापैकी सुमारे 54 नद्या भारतातून आणि 3 नद्या म्यानमारमधून येतात. याची तुलना भारताशी केली तर भारतात लहान-मोठ्या मिळून सुमारे 200 नद्या आहेत.

भारत-बांगलादेश सीमा : भारत-बांगलादेश सीमा ही 4096.7 किमी लांबीची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. ही सीमा 1947 मध्ये स्थापन झाली आणि ती जगातील सर्वात लांब स्थलसीमांपैकी एक मानली जाते.

बांगलादेश कधी स्वतंत्र झाला? : 1971 मध्ये बांगलादेश स्वतंत्र देश म्हणून उदयास आला. यापूर्वी या प्रदेशाला पूर्व पाकिस्तान असे म्हटले जात होते. बाग्लादेशच्या स्वातंत्र्य लढ्यात भारतीय सैन्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती.