GK : होर्मुझच्या सामुद्रधुनीची सीमा किती देशांना लागून आहे? भारतापासून किती दूर?

Strait of Hormuz : इराण आणि अमेरिका या देशामधील तणाव निर्माण झाला आहे. यामुळे इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवले आहे. या सामुद्रधुनीची सीमा कोणत्या देशांना लागून आहे ते जाणून घेऊयात.

बापू गायकवाड | Updated on: Apr 13, 2026 | 10:26 PM
1 / 5
भौगोलिक स्थान आणि सीमा : 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा एक अत्यंत अरुंद जलमार्ग असून तो प्रामुख्याने दोन देशांशी आपली सीमा सामायिक करतो. त्याच्या उत्तर किनारपट्टीवर इराण आहे, तर दक्षिण किनारपट्टीवर ओमान हा देश स्थित आहे.

भौगोलिक स्थान आणि सीमा : 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' हा एक अत्यंत अरुंद जलमार्ग असून तो प्रामुख्याने दोन देशांशी आपली सीमा सामायिक करतो. त्याच्या उत्तर किनारपट्टीवर इराण आहे, तर दक्षिण किनारपट्टीवर ओमान हा देश स्थित आहे.

2 / 5

सामरिक महत्त्व: हा जलमार्ग पर्शियन आखात आणि अरबी समुद्राला जोडणारा एकमेव मार्ग आहे. जगातील तेल आणि ऊर्जेचा मोठा पुरवठा याच मार्गावरून होतो, त्यामुळे याला जागतिक अर्थव्यवस्थेची 'जीवनरेखा' मानले जाते.

3 / 5

जलमार्गाची रुंदी : ओमान आणि इराणच्या दरम्यान असलेला हा मार्ग भौगोलिकदृष्ट्या खूपच अरुंद आहे. याची रुंदी साधारणपणे 21 ते 30 किलोमीटरच्या दरम्यान आहे.

4 / 5

भारतासाठी महत्त्व : भारत आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर या जलमार्गावर अवलंबून आहे. भारताकडे येणारे बहुतांश तेल टँकर्स याच मार्गाने प्रवास करतात.

5 / 5

भारतापासूनचे अंतर : गुजरातच्या कांडला बंदरापासून 'स्ट्रेट ऑफ होर्मुज'चे अंतर साधारण 1000 ते 1550 किलोमीटर आहे. तेल टँकर्सना या मार्गावरून भारतात पोहोचण्यासाठी साधारणपणे 2 ते 3 दिवसांचा वेळ लागतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us