GK : भारताचा मोर, तर पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे?

National Bird : भारत आणि पाकिस्तान हे 1947 पूर्वी एकच देश होता. मात्र स्वातंत्र्यानंतर दोन्ही देश वेगळे झाले. यानंतर भारताने मोर या पक्षाला आपला राष्ट्रीय पक्षी बनवले. मात्र पाकिस्तानने कोणत्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा दिला याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Feb 22, 2026 | 9:50 PM
1 / 5
भारताचा राष्ट्रीय पक्षी : तुम्हाला भारताच्या राष्ट्रीय पक्षाचे नाव माहिती असेल. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी मानला जातो.

भारताचा राष्ट्रीय पक्षी : तुम्हाला भारताच्या राष्ट्रीय पक्षाचे नाव माहिती असेल. मोर हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे. तो पृथ्वीवरील सर्वात सुंदर पक्षी मानला जातो.

2 / 5

पाकिस्तानचा राष्ट्रीय पक्षी : पाकिस्तानचा अधिकृत राष्ट्रीय पक्षी 'चकोर' हा आहे. पौराणिक कथांनुसार, चकोर पक्षाचे चंद्रावर अतोनात प्रेम असते. तो रात्री चंद्रप्रकाशात (चांदण्यात) इतका तल्लीन होतो की, पापणीही न लववता तासनतास चंद्राकडे पाहत राहतो असे मानले जाते.

3 / 5

साहित्यातील स्थान : आपल्या याच वैशिष्ट्यामुळे चकोर पक्षी सुफी संगीत आणि शास्त्रीय साहित्यात 'एकनिष्ठ प्रेमी' म्हणून ओळखला जातो. हे पक्षी दाट जंगलांऐवजी डोंगराळ भाग, उघड्या टेकड्या आणि खडकाळ प्रदेशात राहणे अधिक पसंत करतात.

4 / 5

उंचीवर राहण्याची क्षमता : चकोर पक्षी समुद्रसपाटीपासून 2000 ते 4000 मीटर (सुमारे 4 किमी) उंचीवर देखील सहज जिवंत राहू शकतात.

5 / 5

शारीरिक वैशिष्ट्ये : हा पक्षी तपकिरी-राखाडी रंगाचा असतो. त्याच्या डोळ्यांखाली एक काळी पट्टी असते आणि अंगावर काळ्या-कत्थई रंगाचे पट्टे असतात, ज्यामुळे तो खडकाळ भागात शत्रूंपासून स्वतःचा बचाव करू शकतो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us