GK : भारत नव्हे, हा आहे जगातील सर्वात सुरक्षित देश

Safest Country : भारतातील अनेक अशी शहरे आहेत जिथे क्राइम रेट सर्वाधिक आहे. मात्र जगात असा एक देश आहे जिथे गुन्हेगारी दर अत्यंत कमी आहे हा देश कोणता आहे याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 08, 2025 | 11:05 PM
1 / 5
आईसलँड हा जगातील सर्वात सुरक्षित देश आहे, कारण आईसलँडचा गुन्हेगारी दर, विशेषतः हिंसक गुन्ह्यांचा दर, जगातील इतर देशांच्या तुलनेत नगण्य आहे. दरवर्षी येथे 1 ते 9 किंवा शून्य लोकांचा खून होतो.

2 / 5
आईसलँडच्या पोलीसांना दैनंदिन कर्तव्यावर असताना शस्त्रे बाळगण्याची परवानगी नसते. यामुळे नागरिकांमध्ये आणि पोलिसांमध्ये शांतता आणि विश्वास टिकून राहतो.

3 / 5
या देशात सामाजिक आणि आर्थिक समानता खूप जास्त आहे. श्रीमंत आणि गरीब यांच्यातील मोठी दरी येथे नसल्यामुळे, गुन्हेगारीला कारणीभूत ठरणारे द्वेष आणि नैराश्य कमी असते. त्यामुळे नागरिक सुरक्षित आहेत.

4 / 5
आईसलँडमध्ये आरोग्य सेवा, शिक्षण आणि बेरोजगारीचे लाभ यांसारख्या क्षेत्रांमध्ये सरकारी मदत उपलब्ध आहे. यामुळे लोकांना जगण्यासाठी अवैध मार्गांचा अवलंब करण्याची गरज पडत नाही.

5 / 5
आईसलँडची एकूण लोकसंख्या सुमारे 3.7 लाख आहे. लोकसंख्या कमी असल्यामुळे, लोकांचा एकमेकाशी जवळचा आणि व्यक्तिगत संबंध असतो. प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो, ज्यामुळे क्राइम रेट कमी आहे, त्यामुळे सर्व लोक सुरक्षित आहेत.