
कोंबडा आणि कोंबडीतील फरक म्हणजे कोंबडा मोठा असतो आणि कोंबडी थोडी लहान असते. कोंबड्यावर संपूर्ण कळपाचे रक्षण करण्याची जबाबदारी असते, त्यामुळे त्याचे शरीर शक्तिशाली असते.

कोंबडा आणि कोंबडीच्या वर्तनातही फरक असतो, कोंबड्याचे वर्तन अधिक आक्रमक असते. तर कोंबडीचा स्वभाव खूपच शांत असतो. मात्र तिचे संरक्षण कोंबडा करतो.

कोंबडा हा नर असतो, तर कोंबडी मादी असते. त्यांच्या आवाजात फरक आहे. कोंबडा मोठ्याने आरवतो. तर कोंबडीचा आवाज हा खूप लहान आणि वेगळा अलतो. तुम्हालाही असा प्रश्न पडला असेल की कोंबडी का आरवत नाही?

कोंबडा आरवतो कारण त्याच्या शरीरात असलेल्या हार्मोनल क्रियेमुळे आणि जैविक घड्याळामुळे त्याला आरवण्याची प्रेरणा मिळते. मात्र कोंबडीच्या शरीराची रचना आणि हार्मोन्स वेगळे असतात, त्यामुळे ती आरवत नाही.

कोंबड्याच्या शरीरात हार्मोनल क्रिया पहाटे सर्वाधिक असते, ज्यामुळे ते पहाटे आरवतात. कोंबड्यांमध्ये जैविक घड्याळ असते, जे प्रकाशातील बदलांनुसार काम करते, सूर्योदयाची चाहुल लागतात कोंबडे आरवतात.