Lakshmi Devi: या 6 कारणांमुळे देवी लक्ष्मी आपल्यावर रुसते, वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे ते जाणून घ्या

हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची धन देवी म्हणून पूजा होते. ज्या घरात देवी लक्ष्मीचा वास असतो, त्या घरात कधीच आर्थिक चणचण भासत नाही. पण वास्तुशास्त्रानुसार काही चुका या अंगलट येतात. त्यामुळे देवी लक्ष्मी घरात वास करणं कठीण होतं. त्यामुळे काही चुका टाळणं गरजेचं आहे.

| Updated on: Jun 03, 2025 | 5:14 PM
1 / 7
हिंदू धर्मात देवी लक्ष्मीची  पूजा आर्थिक अडचणीतून सुटका होण्यासाठी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, देवी लक्ष्मीची कृपा असेल तर पैशांची चणचण भासत नाही. पण अनेकदा लोकांकडून अज्ञानामुळे चुका होतात. त्यामुळे देवी लक्ष्मीची अवकृपा होते, असं मानलं जातं. चला जाणून घेऊयात या बाबत...

2 / 7
वास्तुशास्त्रानुसार, ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात देवी लक्ष्मी कधीच प्रवेश करत नाही. स्वच्छता असलेल्या घरातच देवी लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे देवी लक्ष्मीची कृपा हवी असल्यास स्वच्छता राखणं गरजेचं आहे.

3 / 7
हिंदू धर्मात झाडू ही देवी लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. त्यामुळे झाडू चुकीच्या ठिकाणी ठेवली तर लक्ष्मी थांबत नाही. झाडू कधीच घराच्या दरवाजाजवळ ठेवू नये. तसेच पाय लावू नये. रात्री झाडू मारल्याने देवी लक्ष्मी नाराज होते.

4 / 7
वास्तुशास्त्रानुसार, रात्री उष्टी भांडी ठेवू नयेत. असं करणं अशुभ मानलं जातं. ज्या घरात रात्रीची उष्टी भांडी सकाळसाठी सोडली जातात. त्या घरात देवी लक्ष्मी राहात नाही. इतकंच काय तर आर्थिक स्त्रोतही कमी होतात.

5 / 7
धार्मिक मान्यतेनुसार, बेडवर बसून जेवणं अशुभ मानलं गेलं आहे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा राहते. तसेच देवी लक्ष्मी वास करत नाही. आर्थिक समस्यांना सामोरं जावं लागतं.

6 / 7
ज्या घरात सकाळी उशिरापर्यंत झोपलेलं असतं त्या घरात लक्ष्मी राहात नाही. यासाठी सकाळी सूर्योदयापूर्वी उठलं पाहीजे. तसेच ज्या घरात सूर्यास्तावेळी झोपतात त्या घरातही लक्ष्मी प्रवेश करत नाही.

7 / 7
ज्या घरात कायम भांडणं होत असतात त्या घरात देवी लक्ष्मी प्रवेश करत नाही. ज्या घरात वडीलधारी व्यक्ती आणि महिलांचा सन्मान होत नाही त्या घरातही देवी लक्ष्मी राहात नाही.  (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदी)