Gold Rate : लग्नसराईत सोनं महागणार की स्वस्त होणार? जाणून घ्या काय होऊ शकतं!

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात वाढ होताना पाहायला मिळत आहे. आता लग्नसराई आली आहे. त्यामुळे भविष्यात नेमकं काय होणार? असं विचारलं जात आहे.

| Updated on: Nov 03, 2025 | 9:41 PM
1 / 6
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठा चढउतार पाहायला मिळत आहे. सध्या लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे आता या दोन्ही मौल्यवान धातूंची किंमत वाढण्याची शक्यता आहे.

2 / 6
सोमवारी (3 ऑक्टोबर) सोन्याच्या भावात वाढ नोंदवली गेली. Multi Commodity Exchange of India (एमसीएक्स) च्या डेटानुसार सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सोन्याचा भाव  0.31 टक्क्यांनी वाढून साधारण 1,21,603 प्रति 10 ग्रॅम रुपयांवर जाऊन पोहोचला.

3 / 6
चांदीचा भावदेखील  0.42 टक्क्यांनी वाढून 1,48,906 प्रति किलोवर जाऊन पोहोचला. सध्या लग्नसराई चालू झाली आहे त्यामुळे सोने आणि चांदीचा भाव असाच वाढत राहणार का? असे विचारले जात आहे.

4 / 6
लग्नसराईत लोक मोठ्या प्रमाणात दागिने तयार करतात. त्यामुळे या काळात सराफा बाजारात मोठी उलाढाल होते. सोन्याचा भाव वाढणार की कमी होणार हे अनेक गोष्टींवरून ठरणार आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाला तर सोन्याचा भाव वाढू शकतो.

5 / 6
तसेच जागतिक स्तरावर बँकांनी व्याजदरात कपात केली आणि चीनारख्या देशामध्ये सोन्याची मागणी घटली तर सोने स्वस्त होऊ शकते. देशांतर्गत सराफा बाजाराच्या स्थितीवरदेखील सोन्याचा भाव अवलंबून आहे.

6 / 6
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)