सोने चांदीच्या दरात सर्वात मोठी घसरण, 64,90,00,00,00,000 चे नुकसान, सराफा बाजारात खळबळ..
Gold-Silver Prices : सोने आणि चांदीच्या भावात मोठी घसरण होत आहे. जागतिक बाजारातील घडामोडींचा प्रभाव सोने आणि चांदीवर आहे. काही तासात कोट्यावधी रूपयांचे नुकसान झाले असून मोठे नुकसान सहन करावे लागत आहे.

सोने आणि चांदीच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होत आहे. त्यातच आता जागतिक बाजारात सोन्याची मान टाकली. अमेरिकेतून सोने खरेदीबद्दल मोठी माहिती पुढे आली. सप्टेंबर 2025 नंतर नीचांकी भाव पोहोचले आहेत. बाजारमूल्यांत 128 अब्ज डॉलर म्हणजेच 11.4 लाख कोटी रूपयांची घट नोंदवण्यात आली.
अमेरिकेतील महागाई हेच सोन्याच्या घसरणीचे कारण असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. डॉलर वेगाने मजबूत होत आहे.चांदीने तर घसरणीचा विक्रमच मोडला आहे. चांदीची तब्बल 61 टक्क्यांनी घसरण झाली. जागतिक बाजारात चांदीचा व्यवहार हा डॉलरवर होतो.
कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे. महागाईचा मोठा धोका निर्माण झाला. यापूर्वी झाली नाही अशी भयंकर घसरण सोने आणि चांदीच्या भावात होत आहे.
12 तास 64,90,00,00,00,000 चे नुकसान झाले. त्यातच आता सोने आणि चांदीत गुंतवणूक करायची की, नाही असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. तज्ज्ञांच्या मते आता सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणे धोकादायक ठरू शकते.
अमेरिकेतील परिस्थितीमध्ये कोणत्याही घडामोडी घडू शकतात. तज्ज्ञांच्या मते सोन्याचा भाव हा 1 लाखाच्या आतही येऊ शकतो. 12 तासात गुंतवणूकदारांचे लाखो रूपये बुडाले आहेत. त्यामुळे सध्या सोने चांदीत गुंतवणूक करणे म्हणजे पैसे बुडवण्यासारखेच आहे.