
इराण आणि इजराइल यांच्यातील पेटलेल्या युद्धामुळे परिणामी सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ झाली होती.

जळगावच्या सराफ बाजारात सोने ६०० रुपये तर चांदीचे दर ४ हजार रुपयांनी घसरले. त्यामुळे ग्राहकांना अचानक लॉटरी लागली. आतापर्यंत दरवाढीने हैराण असलेल्या ग्राहकांना दिलासा मिळाला.

सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाल्याचे चित्र जळगावच्या सराफ बाजारात पहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसात पहिल्यांदाच सोन्या आणि चांदीच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. सोने आणि चांदीतील घसरणीचा फायदा घेण्यासाठी ग्राहकांनी दिवसभरात गर्दी केली होती.

युद्धामुळे वाढलेल्या दरांना कुठलाही आधार नसल्याने दरात घसरण झाली असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

इस्त्रायल- इराण यांच्यात सुरु असलेल्या युद्धामुळे सोने चांदीच्या दरात वाढ झाली होते.