सोन्याच्या दरात मोठी वाढ, थेट एक लाखांच्या पार, किती रुपयांनी महागलं?

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. आज सोनं चांगलंच महागलं आहे. या भाववाढीमुळे सोन्याचा दर एक लाखांच्या पुढे गेलाय.

| Updated on: Jul 19, 2025 | 4:44 PM
1 / 5
सोने हा धातू फारच मौल्यवान आहे. या धातूपासून वेगवेगळे दागिने केले जातात. विशेष म्हणजे भारतात तर सोन्याच्या दागिन्यांना चांगलीच मागणी असते.

सोने हा धातू फारच मौल्यवान आहे. या धातूपासून वेगवेगळे दागिने केले जातात. विशेष म्हणजे भारतात तर सोन्याच्या दागिन्यांना चांगलीच मागणी असते.

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात मोठे चढऊतार पाहायला मिळत आहेत. आता पुन्हा एकदा सोन्याचा भाव वाढला आहे. यावेळच्या भाववाढीमुळे सोनं थेट एक लाखाच्या पार गेलं आहे.

3 / 5

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात 800 रुपयांची वाढला आहे. त्यामुळे आता सोन्याच्या दर थेट एक लाख रुपयांच्याही पुढे गेला आहे. सोनं थेट आठशे रुपयांनी वाढल्यामुळे आता दागिने करताना जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.

4 / 5

या भाववाढीनंतर सोन्याचा दर जीएसटीसह 1 लाख 1 हजार रुपयांवर पोहोचला. आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडीमुळे सोन्याचे दर वाढले असून भविष्यातही सोन्याच्या दरात चढउतार पाहायला मिळणार आहे.

5 / 5

दरम्यान, सोन्याचा भाव आता वाढत असल्याने हा गुंतवणुकीसाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो, असे बोलले जातेय. तर दागिने करणाऱ्यांच्या खिशाला मात्र या भाववाढीमुळे झळ बसणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us