Gold Treasure : जमिनीतून बाहेर काढला 1300 वर्षांपूर्वीचा अनमोल खजिना, महिलेची ती एक वस्तू सापडल्याने सगळे थक्क!

हा सोन्याचा दागिना साधारण 1300 वर्षांपूर्वीचा आहे. ब्रिटनमध्ये जमिनीखाली तो गाडला गेला होता. हा दागिना एखाद्या छोट्या लॉकेटप्रमाणे आहे. परंतु त्यावरील कलाकुसर आणि त्यावरील नक्षीकाम पाहून पुरातत्त्व क्षेत्रातील तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत.

Gold Treasure : जमिनीतून बाहेर काढला 1300 वर्षांपूर्वीचा अनमोल खजिना, महिलेची ती एक वस्तू सापडल्याने सगळे थक्क!
britain gold locket and treasure hunting
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 9:38 PM

Treasure Hunting : खजिना मानवासाठी नेहमीच आश्चर्याचा विषय राहिलेला आहे. जमिनीखाली गाडला गेलेला सोन्याचा, दागिन्यांचा खजिना सापडावा यासाठी अनेक लोकांनी आपलं आयुष्य खर्ची घातलं. काही लोक तर अंधश्रद्धेला बळी पडून मंत्रतंत्राच्या मदतीने एखादा गूढ खजिना शोधण्याचा प्रयत्न करतात. परंतु पृथ्वीच्या पोटातून कधीकधी असं काही बाहेर येतं जे सर्वांनाच धक्क करतं. याआधी सोन्यची नाणी, दागिने तसेच रत्नजडीत मुर्त्या खोदकामात सापडलेल्या आहेत. हा खजिना आजही अनेक वस्तू संग्रहालयांत सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी असाच एका महिलेचा अनमोल दागिना जमिनीतून शोधून काढण्यात आला. आज हा दागिने सुरक्षित ठेवण्यात आलेला आहे. सोन्याचा हा दागिना साधारण 1300 वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज लावला जातो. या दागिन्याचा शोध कसा लागला, त्याचं वैशिष्ट्य काय हे जाणून घेऊ या..

पुरातत्त्व क्षेत्रातील तज्ज्ञही आश्चर्यचकित

हा सोन्याचा दागिना साधारण 1300 वर्षांपूर्वीचा आहे. ब्रिटनमध्ये जमिनीखाली तो गाडला गेला होता. हा दागिना एखाद्या छोट्या लॉकेटप्रमाणे आहे. परंतु त्यावरील कलाकुसर आणि त्यावरील नक्षीकाम पाहून पुरातत्त्व क्षेत्रातील तज्ज्ञही आश्चर्यचकित झाले आहेत. विशेष म्हणजे, सातव्या शतकाच्या अखेरीस तयार करण्यात आलेले हे लॉकेट एका ख्रिश्चन महिलेचे असावे, असा अंदाज व्यक्त केला जातो. ब्रिटनमधील नॉरफोक परिसरातील ग्रेट यारमाउथजवळील मार्थम येथे फेब्रुवारी 2025 मध्ये मेटल डिटेक्टरच्या मदतीने हा ऐतिहासिक दागिना शोधण्यात आला होता.

Loading...

अवघ्या 3 सेंटीमीटरच्या लॉकेटवर आश्चर्यकारक कलाकुसर

या लॉकेटची लांबी 3.16 सेंटीमीटर म्हणजेच जवळपास 1.2 इंच असल्याचे सांगितले जाते. आकाराने हा दागिना अगदी लहान दिसतो. परंतु त्यावरील डिझाईन खूपच विशेष आहे. नॉरफोकच्या फाइंड्स लायझन ऑफिसर डॉ. हेलन गीके यांनी याबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यांच्या माहितीनुसार यामध्ये सोन्याच्या तारांपासून डिझाईन तयार केलली आहे. या लॉकेटच्या मध्यभागी क्रॉससारखी आकृती आहे. त्यामध्ये लाल रंगाचा खडा आहे. सध्या हा दागिना सुरक्षित ठेवण्यात आलेला असून सुंदर दागिन्याचा हा एक चांगला नमूना असल्याचे बोलले जाते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us