Gold Rate : सोनं झालं धडाम, तब्बल 22000 हजारांनी स्वस्त, एका महिन्यात 10 ग्रॅमची किंमत थेट….
सोनं सध्या स्वस्त झालंय. गेल्या महिनाभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 22,000 रुपयांची घट झाली आहे. MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.43 लाख रुपयांवरून घसरून सुमारे 1.22 लाखांवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याचा भाव कमी तर कधी जास्त होताना दिसतोय. सोनं सध्या 1 लाख 22 हजारांवर आलंय. कधीकाळी सोनं दीड लाख रुपयांचा टप्पा पार करू शकतं, अशी स्थिती होती.
दरम्यान, सोनं सध्या स्वस्त झालंय. गेल्या महिनाभरात सोन्याच्या किमतीत तब्बल 22,000 रुपयांची घट झाली आहे. MCX वर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1.43 लाख रुपयांवरून घसरून सुमारे 1.22 लाखांवर आला आहे.
या घसरणीमुळे लग्नसराईसाठी दागिने खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 25 नोव्हेंबर रोजी MCX वर सोन्याचा भाव घसरून 1,17,906 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला होता. मात्र, 26 नोव्हेंबरला बाजारात काहीशी सुधारणा दिसून आली आणि सोन्याचा भाव 1,22,580 रुपयांच्या आसपास व्यवहार करत होता.
अमेरिकेत व्याजदर वाढण्याची शक्यता आणि डॉलर मजबूत झाल्यामुळे सोन्याच्या दरावर दबाव निर्माण झाला आहे. महागाईची चिंता, गुंतवणूकदारांकडून होणारी नफावसुली यांचाही परिणाम सोन्याच्या भावावर होतोय. दरम्यान, अशा स्थितीत सोनं खरेदी करावं का? असा सवाल उपस्थित केला जातोय.
सोन्याचे दर कमी झाल्यामुळे ग्राहकांना खरेदीची संधी निर्माण झाली असली, तरी पुढील काळात भाव कोणत्या दिशेने जातील हे निश्चित नाही. अमेरिकेतील आर्थिक घडामोडी आणि डॉलरमधील बदलांचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सध्याच्या घसरणीनंतरही दर आणखी कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)