Todays Gold Price Crash Again: मोठी बातमी! सोन्याच्या दरात 4800 रूपयांची घसरण, आज 10 ग्रॅम सोने…
Todays Gold Price Crash Again:एका दिवसात जळगावच्या सराफ बाजारात दोन वेळा सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे सोन्याचे भाव हे चांगलेच घसरले आहेत. चला जाणून घेऊया आजचा सोन्याचा भाव काय आहे?

भारतीय संस्कृतीमध्ये सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंना प्रचंड महत्त्व दिले जाते. त्यामुळे अनेक भारतीयांचा कल हा सोने आणि चांदी खरेदीकडे असतो. मात्र, अंतरराष्ट्रीय बाजारात घडत असलेल्या घडामोडींमुळे सोने आणि चांदीचे दर चांगलेच वाढले होते. आता हे दर कोसळले असल्याचे चित्र आहे.
आज जळगावच्या सराफ बाजारात दोन वेळा सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तासाभरातच आणखी सोन्या चांदीच्या दरात प्रत्येकी एक हजार रुपयांची घसरण झाली आहे. दिवसभरात सलग दुसऱ्यांदा घसरण झाल्यामुळे अनेकांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
25 नोव्हेंबर रोजी सोन्याच्या दरात आतापर्यंत 4 हजार 800 रूपये तर चांदीच्या दरात 10 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे.
आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटी सह 1 लाख 25 हजार 660 रूपये झाला आहे. तर एक किलो चांदीचा दर जीएसटी सह 1 लाख 52 हजार 440 रूपये आहे.
(Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही.)