Gold Rate Decrease : सराफा बाजारात खळबळ, सोन्याचा भाव धाडकन कोसळला, 10 ग्रॅमची किंमत घसरून थेट…नवा रेट काय?

सोन्याच्या या घसरणीत सर्व कराचाही समावेश आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार याआधी शुक्रवारी सोन्याचा बंद भाव 1,45,200 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. सोन्याची ही घसरण डिसेंबर 2025 च्या स्तरापर्यंत पोहोचली आहे.

| Updated on: Nov 01, 2026 | 9:52 PM
1 / 5
सध्या सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याचे दिसत आहे. आज (1 नोव्हेंबर) रविवारीदेखील सोन्याचा भाव चांगलाच घसरला असूनम आता सोनं डिसंबर 2025 मधील भावाएवढं स्वस्त झालंय.

सध्या सोने आणि चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात पडझड होत असल्याचे दिसत आहे. आज (1 नोव्हेंबर) रविवारीदेखील सोन्याचा भाव चांगलाच घसरला असूनम आता सोनं डिसंबर 2025 मधील भावाएवढं स्वस्त झालंय.

2 / 5

समोर आलेल्या माहितीनुसार सोन्याचा भाव आज एकाच दिवसात तब्बल 3200 रुपयांनी घसरलाय. तर चांदीचा भाव 4200 रुपयांनी कमी झालाय. भारतात 99.99 टक्के शुद्ध सोन्याचा भाव 3200 रुपयांनी घसरून थेट 1,42,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कोसळलाय.

3 / 5

सोन्याच्या या घसरणीत सर्व कराचाही समावेश आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार याआधी शुक्रवारी सोन्याचा बंद भाव 1,45,200 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. सोन्याची ही घसरण डिसेंबर 2025 च्या स्तरापर्यंत पोहोचली आहे.

4 / 5

26 डिसेंबर 2026 रोजी सोन्याचा भाव 1,42,300 रुपये प्रति 10 ग्रॅम एवढा होता. चांदीचा भावही 4,200 रुपयांनी घसरून थेट 1,86,000 रुपये प्रतिकिलोपर्यंत कमी झालाय. याआधी शुक्रवारी चांदीचा बंद भाव 1,90,200 रुपये प्रति किलो होता.

5 / 5

दरम्यान, सोने आणि चांदीचा घसरलेला हा भाव लक्षात घेऊन आता सोन्यात गुंतवणूक करावी का? असे विचारले जातेय. परंतु तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us