Gold Rate : एकाच दिवसात सोन्याचा भाव धडाम, 10 ग्रॅमचा दागिना आता फक्त…सराफा बाजारात नवा इतिहास घडला!
24 कॅरेट सोन्याचा दर 140000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षभरातील सोन्याचा हा नीचांकी स्तर आहे. अमेरिका आणि भारतातील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने ही पडझड पाहायला मिळत आहे.

सोने आणि चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. जागतिक घडामोडी तसेच देशांतर्गत परिस्थितीमुळे सोने आणि चांदीचा भाव कमी होताना दिसतेय.
मिळालेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचा दर 140000 प्रति 10 ग्रॅमपर्यंत घसरला आहे. गेल्या वर्षभरातील सोन्याचा हा नीचांकी स्तर आहे. अमेरिका आणि भारतातील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा जास्त असल्याने ही पडझड पाहायला मिळत आहे.
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेकडून डिसेंबरमध्ये व्याजदर वाढीची शक्यता आहे. त्यामुळेही सोन्याचा भाव घसरत असल्याचे सांगितले जातेय. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 9,900 डॉलर प्रति औंसच्या खाली आला आहे.
MCX वर विक्रीचा दबाव वाढला आहे. गेल्या आठवडाभरात MCX सोन्याच्या दरात 4 टक्क्यांहून अधिक घसरण झालेली पाहायला मिळत आहे.
व्याजदर, डॉलरची मजबूत स्थिती, फेडरल रिझर्व्ह रेपो रेट वाढवण्याची शक्यता यामुळे सध्या सोने-चांदीचा भाव कमी होताना दिसतोय. आगामी काळातील बाजाराची स्थिती लक्षात घेऊन, तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच सोन्यात गुंतवणूक करावी, असे आवाहन केले जातेय.