
जळगावात सराफ बाजारात सोन्याचे दर पुन्हा एक लाख रुपयांवर पोहोचलेले आहेत. 24 तासात सोन्याचे दरात 800 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 2 हजार 500 रुपयांची वाढ झाली आहे.

ताज्या अपडेटनुसार, सोन्याचे दर जीएसटी सह 99 हजार 910 रुपये पोहोचले आहे. चांदीच्या दराने ही एक लाखांचा आकडा पार केला आहे. चांदीचे दर जीएसटी सह 1 लाख चार हजार 545 रुपयांवर पोहोचले आहेत.

गेल्या 15 दिवसांपूर्वी जीएसटीसह सोन्याचे दर हे 95 हजार रुपये एवढे होते, पंधरा दिवसात सोन्याच्या दरात चार हजार 900 रुपयांची वाढ झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात चढउतार कायम असल्याने तर दुसरीकडे सोन्या चांदीचे दर एक लाखांवर पोहोचल्याने सराफ बाजारात ग्राहकांवर परिणाम झाला आहे

सोन्याने चांदी मध्ये होत असलेल्या सततच्या चढ उतारामुळे ग्राहक संभ्रमात असून सराफ बाजारात त्याचा मोठा परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारातील दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी कमी झाली असून शुकशुकाट पाहायला मिळत आहे

सोन्याचे दर लाखांवर पोहोचल्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडलं आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे हौस कशी पूर्ण करायची असा प्रश्न उपस्थित करत बेन्टेक्सचे दागिने वापरण्याची वेळ आल्याचे महिला ग्राहकांनी सांगितलं.

असेच दर वाढत राहिले तर काही दिवसांनी सराफाच्या दुकानांमध्ये महिलाच दिसणार नाहीत अशा भावना सुद्धा यावेळी ग्राहक महिलांनी व्यक्त केल्या