
गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या भावात मोठा चढउतार पाहायला मिळतो आहे. कधी या दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ होत आहे. तर कधी सोन्याचा भाव कमी होताना पाहायला मिळतोय. दरम्यान, आज म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोन्याचा भाव चांगलाच वाढला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

मिळालेल्या माहितीनुसार 13 जानेवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,42,530 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. 12 जानेवारी रोजी हाच भाव 1,42,150 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपये होता. म्हणजेच 13 जानेवारी रोजी सोन्याचा भाव 380 रुपयांनी वाढला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

सोन्याच्या 100 ग्रॅमचा हिशोब करायचा झाला तर 12 जानेवारीच्या तुलनेत 13 जानेवारी रोजी हा भाव 3800 रुपयांनी वाढला आहे. 13 जानेवारी रोजी हा भाव 14,25,300 रुपये प्रति 100 ग्रॅम रुपये आहे. हाच भाव 12 जानेवारी रोजी 14,21,500 प्रति 100 रुपये होता. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

22 कॅरेट सोन्याचा भाव 13 जानेवारी रोजी 1,30,650 रुपये प्रति 10 ग्रॅम रुपयांवर पोहोचला आहे. हाच भाव 12 जानेवारी रोजी 1,30,300 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता. मुंबईमध्ये 13 जानेवारी रोजी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 14,253 रुपयांवर पोहोचला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या) (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)