Gold Rate Today : जळगाव सराफा बाजारात ग्राहकांसाठी आनंदसरी, सोन्याच्या किंमती झाल्या कमी

Gold Price Jalgaon : सोमवारी एकाच दिवशी जळगावच्या सराफा बाजारात ३०९० रुपयांची प्रति १० ग्रॅम घसरण झाली होती. त्यानंतर किंमतीत वधारल्या होत्या. तर आज पुन्हा ग्राहकांसाठी आनंदसरी बरसल्या. सोने स्वस्त झाले. काय आहे आता भाव?

| Updated on: May 15, 2025 | 2:32 PM
1 / 6
चांदीच्या किंमतींनी पु्न्हा लाखाचा टप्पा ओलांडला आहे. या नवीन घडामोडीमुळे चांदीचे दर जीएसटीसह १ लाख ०८ हजार १५० रुपयांवर पोहोचले आहेत.

2 / 6
गेल्या २४ तासात सोन्याच्या दर दीड हजार रुपयांनी कमी झाला. सोन्याचे दर जीएसटी सह ९४ हजार ८०० रुपयांवर पोहोचले. आठवडाभरामध्ये सोन्याचे दर ५ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

3 / 6
आठवडाभरात  पाचवेळा लाखांचा टप्पा पार केलेले शुद्ध सोने गेल्या आठवड्याभरात प्रति तोळा 5 हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे.

4 / 6
१ लाख ९७० रुपये एवढा सर्वकालीन उच्चांक गाठलेले सोन्याचे दर जीएसटीसह आता ९४ हजार ८०० रुपयांपर्यंत घसरले आहेत.

5 / 6
सोमवारी सकाळच्या सत्रात सोन्याच्या किंमतीत २२६६ रुपयांची घसरण नोंदवण्यात आली. सोने ९७ हजार ४३८ रुपयांपर्यंत घसरले. तर सायंकाळी सोन्याच्या किंमतीत ८२४ रुपयांची घट झाली. सोने ९६ हजार ६१४ रुपयांपर्यंत खाली आले. एकाच दिवसात सोने ३०९० रुपयांनी उतरले.

6 / 6
गोल्ड इज बिकमिंग द न्यू करन्सी आणि  टेरिफ अंमलबजावणीनंतर सोन्याच्या दरावर परिणाम झाल्याची माहिती सोने व्यापाऱ्यांनी दिली आहे.