Gold-Silver Rate Today 20 March 2026 : उद्या शनिवार-रविवार बस्त्याचा दिवस… पण आजच सोनं खरेदी करा, नाही तर भाव…? आजचे दर वाचून निर्णय घ्या
Gold-Silver Rate Today 20 March 2026 Latest News Updates in Marathi : गुढी पाडव्याच्या दिवशी सोन्याचे भाव कमी झालेले होते. मात्र दुसऱ्या दिवशी काही ग्राहकांना दिलासा मिळालेला नाही. उलट सोन्याच्या-चांदीच्या दरात आज मोठी वाढ झालेली पहायला मिळाली. 20 मार्च रोजी किती आहेत सोन्याचे दर ?

एकीकडे अमेरिका-इस्त्रायल आणि इराण यांच्यात 3 आठवडयांपासून सुरू असलेले युद्ध आणि कालच होऊन गेलेला गुढी पाडवा.. यानंतर सोन्या-चांदीच्या दरांमध्ये सतत चढउतार होत आहे. काल सण असूनही सोनं-चांदीचे भाव कमी झाले, पण दुसऱ्या दिवशी मात्र उलटं चित्र दिसत आहेत. सोन्याच्या आणि चांदीच्या भावावर चांगलाच परिणाम झाला आहे.

जळगावच्या सराफ बाजारात आठवडाभर मोठी घसरण झालेली होती. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला गुढी पाडव्याचा सण काला झाला, त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी मौल्यवान धातूंच्या दरात, म्हणजेच सोन्या आणि चांदीच्या दरात आज मोठी वाढ झालेली पहायला मिळाली.

गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 1 हजार 800 रुपयांची वाढ झाली. तर चमकणारा धातू चांदीही कसा मागे राहील ? चांदीमुळेही खिशाला मोठा फटका बसणार आहे. कारण चांदीच्या दरात 6 हजार रुपयांची वाढ झाली आहे.

आठवडाभरापासून सलग सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण सुरू होती. त्यामुळे चिंतेचं वातावरण होतं. आज मात्र सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहेय

काल म्हणजेच, गुढीपाडव्याच्या दिवशी, एकाच दिवसात तब्बल सोन्याच्या आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याने मोठी सराफ बाजारात मोठी उलाढाल झाली. सोनं आणि चांदीत मोठी घसरण झाल्याने गुढीपाडव्याला एकाच दिवसात जिल्ह्यात सराफ बाजारात तब्बल 100 कोटींची उलाढाल झाल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी दिली.