Gold Silver Rates Today 11 March 2026 : परमेश्वरा आता काय करायचं ? सोन्याचे दर पुन्हा तापले, एकाच दिवसात झाली वाढ, 10 ग्रॅमसाठी आता मोजावे लागणार..

Gold Silver Rates Today 11 March 2026 in Marathi : जगात युद्धामुळे अशांतता आहे, एकीकडे डॉलर्सचा भावही वाढत आहे. तर दुसरीकडे सोनं चांदीच्या भावातही सातत्याने मोठे चढउतार दिसत आहेत. आजदेखील पुन्हा एकदा सोन्याचा दर चांगलाच वाढला आहे. आजची सोन्याची किंमत किती ? चला घेऊया जाणून...

| Updated on: Mar 11, 2026 | 1:15 PM
1 / 6
बरोब्बर 12 दिवसांपूर्वी  इस्रायल-अमेरिकेकडून इराणवर हल्ला चढवण्यात आला आणि मोठ्या युद्धाला तोंड फुटलं.या युद्धामुळे तीन्ही देशांसह इतरही देश चांगलेच होरपळत आहेत. त्यांचा प्रत्यक्ष युद्धात सहभाग नसला तरी युद्धाच्या झळा जगात सर्वांनाच बसत आहेत. या युद्धाचा अनेक गोष्टींवर परिणाम होत असून भारतातही त्याचे पडसाद दिसत आहेत. याचदरम्यान  सोनं-चांदीच्या दरातही मोठी उलथापालथ झाली आहे.

2 / 6

अनेक महिन्यांपासून सोन्याचे दर वाढताना दिसत आहे. एखाद्या दिवाशी ते खाली येतात, पण एकंदरचं सोन्याचे दर हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवक्यात उरलेले नाहीत. आज जळगावच्या सराफ बाजारामध्येही अशीच परिस्थीत असून सोन्याच्या दरात वाढ झाली आहे.

3 / 6

जळगावच्या सराफ बाजारामध्ये आज सोन्याच्या दरात 100 रुपयांची किरकोळ वाढ झाली आहे. तर दुसरीकडे चांदीच्या दरात मोठी घसरण झाल्याचं पहायला मिळालं आहे.

4 / 6

100 रुपयांची वाढ झाल्यानतंर आज 1 तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्याचे दर हे जीएसटीसह 1 लाख 65 हजार 418 रुपयांवर पोहोचले आहेत. मात्र चांदीची किंमत बरीच घसरली आहे.

5 / 6

चांदीच्या दरात आज 4 हजार रुपयांची घसरण झाली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह 2 लाख 82 हजार 220 रुपयांवर आले आहेत.

6 / 6

अमेरिका व ईराण युद्धाचा परिणाम झाल्याने जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार कायम आहे. आज युद्धाचा बारावा दिवस असून युद्धाच्या परिणामामुळे सोन्याने चांदीच्या दरांमध्ये सातत्याने उलथापालथ होत आहे. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us