Gold and silver rates : सोन्याच्या दरात अचानक मोठी उसळली, चांदीचे दरही गगनाला भिडले, जाणून घ्या नवे रेट
मोठी बातमी समोर येत आहे, गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरूच होती. अखेर या घसरणीला आता ब्रेक लागला असून, सोन्याच्या दरात मोठी उसळी पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची चिंता वाढली होती. मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.
बुधवारी 24 कॅरट सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे तब्बल 4,800 रुपयांची वाढ झाली आहे. सोन्याचे दर वाढल्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे 4,800 रुपयांची वाढ झाल्यामुळे आता सोन्याचे दर प्रति तोळा एक लाख 46 हजार रुपयांवर पोहोचले आहेत.
ऑल इंडिया सराफा असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार 24 कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा 1,41,800 रुपयांवरून वाढून 1,46,600 रुपयांवर पोहोचले आहेत. याचाच अर्थ सोन्याच्या दरात प्रति तोळ्यामागे तब्बल 4,800 रुपयांची वाढ झाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने घसरण सुरू असल्यामुळे सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली होती, परंतु आता भाव वाढल्यामुळे सोने खरेदीला ब्रेक लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान फक्त सोन्याच्या दरातच नाही तर चांदीच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या दरात प्रति किलोमागे तब्बल 9 हजार रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीचे दर 1 लाख 84 हजार प्रति किलोवरून थेट 1 लाख 93 हजार रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.