Tiger Death : कॅनलमध्ये पडून मृत झालेल्या वाघाचं गूढ कायम, शिकार झाल्याचा प्राथमिक अंदाज; वनविभागाचे मौन

| Updated on: Apr 02, 2022 | 8:16 AM

वाघाचा पाय तुटलेला असल्याने वाघाची शिकार झाली असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाघाला लोखंडी सापळ्यात अडकवून मारून वाघाचे अवयव काढण्यात आले आहेत नंतर बावनथडी धरणाच्या कॅनल मध्ये फेकून देण्यात आले आहे.

1 / 4
भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बपेरा गावाजवळील कॅनल मध्ये मृत अवस्थेत वाघ आढळून आला होता.

2 / 4
 शवविच्छेदन करताना वाघाच्या शरीरावर जखमांच्या खुणा आढळून आल्या  आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितनुसार वाघाच्या पायाची 8 नखे, 1 दात गायब होता.

3 / 4
तसेच वाघाचा पाय तुटलेला असल्याने  वाघाची शिकार झाली असल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वाघाला लोखंडी  सापळ्यात अडकवून  मारून वाघाचे अवयव काढण्यात आले आहेत नंतर  बावनथडी धरणाच्या कॅनल मध्ये फेकून देण्यात आले आहे.

4 / 4
जणू वाघ हा पाण्यात बुडून मृत झाल्याचा बनाव आरोपींनी केला आहे. मात्र या संदर्भात वनविभागाने मौन धारण केल्याने वनविभागावर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. तर शवविच्छेदन झाल्यानंतर वाघाला जाळण्यात आले आहे.