Ladaki Bahin Yojna: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! मे महिन्याचे 1500 रुपये… बँक खाते करा चेक

Ladaki Bahin Yojna: ई-केवायसी प्रक्रियेमुळे गेल्या चार महिन्यांपासून लाडकी बहिण योजनेचे पैस महिलांना मिळाले नव्हते. आता याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

| Updated on: Jun 16, 2026 | 3:23 PM
1 / 5
महाराष्ट्राच्या राजकारणात 'मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना' ही गेम चेंजर ठरली. या योजने अंतर्गत लाभार्थी महिलांना प्रत्येक महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये ई-केवायसी करुनही महिलांना मदत मिळत नव्हती. आता या योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

2 / 5

गेल्या काही दिवसांपासून मे महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या राज्यभरातील पात्र महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. या महिलांच्या बँक खात्यात आता 1500 रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

3 / 5

लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी १० जून रोजी ३४४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. हा निधी महिला व बालविकास विभागाकडे वर्ग करण्यास मंजुरी देण्यात आली होती.

4 / 5

याआधी राज्य शासनाने लाडकी बहिण योजनेच्या पात्र महिलांना मार्च आणि एप्रिल महिन्यांचा निधी एकत्रितपणे दिला होता. आता थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे मे महिन्याचा निधी टप्प्याटप्प्याने वितरित केला जात आहे.

5 / 5

मे महिन्याचा हप्ता १५ जूनपासून वितरित केला जात असला तरी, तांत्रिक कारणांमुळे किंवा सर्व्हरच्या समस्येमुळे अनेक महिलांना बँकेकडून पैसे जमा झाल्याचा 'एसएमएस' प्राप्त झालेला नाही. यामुळे अनेक महिलांमध्ये संभ्रम आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us