Ajit Pawar Kolhapur : अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूरात शासकीय ध्वजारोहण, कार्यकर्त्यांची उपस्थिती

| Updated on: Aug 15, 2023 | 11:30 AM

AJIT PAWAR KOLHAPUR PHOTO : आज अजित पवार कोल्हापूरमध्ये अनेक नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार आहेत. त्यांनी आज सकाळी शासकीय ध्वजारोहण केलं आहे.

1 / 5
 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापनदिनानिमित्ताने ध्वजारोहण केले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचे स्मरण करुन त्यांना अभिवादन केले.

2 / 5
यावेळी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर आणि छत्रपती शाहू महाराज व राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक व इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातील जनतेला उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

3 / 5
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापूरकर नागरिकांना भेटून त्यांची निवेदने स्वीकारून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

4 / 5
कोल्हापूरात अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या मराठा समाजाच्या बैठकीत गोंधळ झाला असल्याची माहिती मिळाली आहे. ही बैठक कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू होती.

5 / 5
योगेश केदार आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी बैठकीत अचानक गोंधळ घातल्यामुळे परिस्थिती नियंत्रणा पलिकडे गेली होती. विशेष म्हणजे ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करत गोंधळ घातला आहे. त्यानंतर पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली आहे.