
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी मोठी संधी आहे. विशेष म्हणजे नवोदय विद्यालय समितीकडून ही भरती प्रक्रिया राबवली जातंय. या भरती प्रक्रियेतून विविध पदे ही भरली जाणार आहेत.

ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी पार पडत असल्याने शिक्षणाची अटही पदानुसार लागू करण्यात आलीये. 30 एप्रिल 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

1377 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. navodaya.gov.in या साईटवर जाऊन आपल्याला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत.

navodaya.gov.in वरच आपल्याला भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती ही आरामात मिळेल. विशेष म्हणजे या भरती प्रक्रियेसाठी दहावी पास ते पदवीधर अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 1000 रूपये फीस ही भरावी लागणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खरोखरच ही मोठी संधी म्हणावी लागेल.