Govinda : तो कारने यायचा, गोविंदा रिक्षाने, त्याच जळफळाटीतून एकदिवस गोविंदाने…

Govinda : गोविंदा बॉलिवूडमधील एक मोठं नाव आहे. त्याने हिंदी सिनेमात अनेक कमालीचे चित्रपट दिलेत. चित्रपटांशिवाय गोविंदा सध्या त्याच्या पर्सनल लाईफमुळे सुद्धा चर्चेत आहे.

| Updated on: Sep 02, 2025 | 4:38 PM
1 / 5
काही दिवसांपूर्वी गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता अहुजा यांच्या घटस्फोटाची अफवा पसरलेली. सुनीताने अनेकदा या चर्चा फेटाळून लावल्या. दोघे गणेश चतुर्थीच्या पूजेत एकत्र दिसले. अभिनेत्याच्या फिल्मी सफरबद्दल बोलायच झाल्यास, 90 च्या दशकात त्याने इतके कमलीचे चित्रपट दिलेत की, गोविंदाला हिट मशीन म्हटलं जायचं. गोविंदाने अनेक मोठ्या फिल्ममेकर्ससोबत काम केलय.

2 / 5
गोविंदाने पहलाज निहलानी यांच्यासोबत काम केलय. इल्जाम, शोला, शबनम आणि आंखें सारखे चित्रपट एकत्र केले. निहलानी यांनी अलीकडेच गोविंदाच्या सुरुवातीच्या दिवसाबद्दल खुलासा केलाय. पहलाज निहलानी  गोविंदासोबत लव 86 चित्रपटात काम करत होते. त्या चित्रपटात गोविंदासोबत रोहन कपूर को-स्टार होता. प्रसिद्ध प्लेबॅक सिंगर  महेंद्र कपूर यांचा तो मुलगा होता.

3 / 5
गोविंदाला रोहनपासून खूप असुरक्षित वाटायचं असं पहलाज निहलानी यांनी सांगितलं.रोहन सेटवर कारने यायचा. तेच गोविंदा रिक्षाने. त्यामुळे गोविंदाला खूप वेगळं वाटायचं.

4 / 5
गोविंदाची त्यावेळची स्थिती पाहून  निहलानी  यांनी त्याला नवीन कार विकत घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी गोविंदाने विनोद मेहरा यांचा एक चित्रपट साइन केलेला. त्याची फी 50 हजार रुपये होती.

5 / 5
त्यानंतर गोविंदाने मारुती 800 खरेदी केली. त्यावेळी या कारची किंमत 1 लाख रुपये होती. गोविंदा शो रुममधून गाडी विकत घेऊन थेट हॉलिडे पार्टीमध्ये आला. त्याने पत्नीला त्या कारमध्ये बसवून फिरवलेलं.