‘या’ सेलिब्रिटींनी डोळ्यांसमोर गमावलं पोटच्या पोरांना, काहींनी पाहिला लेकराचा वेदनादायी मृत्यू; कधीच विसरता न येणारं दु:ख

आपल्या डोळ्यांसमोर पोटच्या पोराला गमावणं हे कोणत्याही आईवडिलांसाठी सर्वांत मोठं दु:ख असतं. पालकांसाठी कदाचित यापेक्षा वेदनादायी गोष्ट कोणतीच असू शकत नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीतही असे अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी त्यांच्या डोळ्यांदेखत मुलाला किंवा मुलीला गमावलं आहे. आयुष्य पुढे गेलं तरी ते या दु:खाला कधीच पचवू शकले नाहीत.

| Updated on: Feb 09, 2026 | 8:24 AM
1 / 7
अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांनी त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला गमावलं होतं. सुनीताने एका मुलाखतीत याचा खुलासा केला होता. जन्माच्या तीन महिन्यांतच त्यांच्या मुलीने आपला जीव गमावला होता,  कारण तिची फुफ्फुसे पूर्णपणे विकसित झाली नव्हती.

2 / 7
अभिनेते कबीर बेदी यांना पहिल्या लग्नापासून पूजा बेदी ही मुलगी आहे आणि सिद्धार्थ नावाचा एक मुलगासुद्धा होता. सिद्धार्थला सिजोफ्रेनिया होता आणि याच आजारपणातून त्याने 1997 मध्ये आत्महत्या केली होती. तेव्हा तो फक्त 25 वर्षांचा होता.

3 / 7
शेखर सुमन यांनीसुद्धा त्यांच्या 11 वर्षांच्या मुलाला गमावलं होतं. आयुष असं त्यांच्या मुलाचं नाव होतं. आयुषला गंभीर आजार होता आणि त्यातूनच त्याचा मृत्यू झाला होता. मुलाच्या निधनानंतर शेखर सुमनचा देवावरून विश्वास उडाला होता. त्यानंतर त्यांनी घरातून देवाच्या सर्व मूर्त्या काढून टाकल्या होत्या.

4 / 7
अभिनेत्री मौसमी चॅटर्जी यांची मुलगी पायलला मधुमेह होता. निधनापूर्वी दोन वर्षे ती कोमामध्ये होती. दोन वर्षांपर्यंत मधुमेहाशी संबंधित इतर आजारांशी झुंज दिल्यानंतर तिने या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता.

5 / 7
अभिनेते प्रकाश राज यांनी त्यांचा मुलगा सिद्धूला गमावलं होतं. पतंग उडवताना उंचावरून पडल्याने त्याचं निधन झालं होतं. त्यावेळी तो फक्त पाच वर्षांचा होता. मुलाच्या मृत्यूने ते पूर्णपणे खचले होते.

6 / 7
टेलिव्हिजन आणि बॉलिवूड अभिनेत्री दिव्या सेठनेही तिच्या मुलीला गमावलं होतं. तिची मुलगी मिहिका शाहने वयाच्या 20 व्या वर्षी या जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. मिहिकाला ताप असताना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता आणि त्यातच तिने आपले प्राण गमावले होते.

7 / 7
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनीसुद्धा त्यांच्या मुलाच्या निधनाचं दु:ख सहन केलं आहे. त्यांचा मुलगा आणि संगीत दिग्दर्शक हेमंत भोसले यांचं स्कॉटलँडमध्ये निधन झालं होतं.