Grammy Awards 2025: प्रसिद्ध रॅपरच्या पत्नीने रेड कार्पेटवरच काढले कपडे, सर्वजण थक्क; अखेर जोडप्याला काढलं बाहेर

ग्रॅमीसारख्या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अमेरिकन रॅपर कान्ये वेस्टच्या पत्नीने तिच्या न्यूड लूकमुळे सर्वांचं लक्ष वेधलंय. रेड कार्पेटवर बियांका सेन्सरीनं अत्यंत पारदर्शी कपड्यांमध्ये फोटोसाठी पोझ दिले. यावरून प्रचंड टीका होत आहे.

| Updated on: Feb 03, 2025 | 10:58 AM
1 / 5
संगीत विश्वातील अत्यंत प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळा 2025 नुकताच पार पडला. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर सेलिब्रिटींचा ग्लॅमरस अंदाज पहायला मिळाला. मात्र प्रसिद्ध अमेरिकन रॅपर कान्ये वेस्ट आणि त्याची पत्नी बियांका सेन्सरी यांच्या एण्ट्रीने सर्वजण थक्क झाले.

2 / 5
ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात कान्येला दोन नामांकनं मिळाली होती. यावेळी तो पत्नी बियांकासोबत रेड कार्पेटवर पोहोचला होता. कान्येनं काळ्या रंगाचे कपडे परिधान केले होते. तर बियांकासुद्धा सुरुवातीला काळ्या रंगाचा मोठा कोट परिधान करून रेड कार्पेटवर आली होती.

3 / 5
मात्र रेड कार्पेटवर येताच बियांकाने तिचा काळा कोट काढला आणि पूर्णपणे पारदर्शी कपड्यांमध्ये फोटोसाठी पोझ दिले. बियांकाचा हा न्यूड लूक सोशल मीडियावर तुफान चर्चेत आला आहे. हाय-प्रोफाइल कार्यक्रमात अशा पद्धतीचे कपडे घातल्याने बियांकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं.

4 / 5
यानंतर कान्ये आणि त्याच्या पत्नीसोबत इतरही पाच जणांना कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आलं. ग्रॅमीसारख्या अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात अशा पद्धतीच्या वागणुकीने सर्वांचंच लक्ष वेधलंय.

5 / 5
कॅलिफोर्निया कायद्यानुसार सार्वजनिक ठिकाणी अश्लील प्रदर्शन म्हणून बियांकावर काही कारवाई होईल का, असा सवालही उपस्थित होत आहे. कान्ये आणि बियांकाने पब्लिसिटी स्टंट म्हणून हे सर्व केल्याच्याही प्रतिक्रिया समोर येत आहेत.