Gudi Padwa 2026: नव्या वर्षाची सुरुवात करा सुंदर रांगोळीने… गुढी पाडव्यासाठी झटपट काढता येणाऱ्या रांगोळ्या

Gudi Padwa 2026: गुढी पाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात... गुढी पाडवा म्हणजे मराठी हिंदू नववर्षाचा पहिला दिवस... या दिवशी घराती सजावट केली जाते. घराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचे तोरण लावले जाते आणि रांगोळी काढली जाते... तर तुम्ही देखील यंदाच्या वर्षी दारात सुंदर रांगोळी काढा...

| Updated on: Mar 18, 2026 | 11:40 AM
1 / 5
असं म्हटलं जातं की,  प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्यावर लोकांकडून गुढी उभारून त्यांचे स्वागत केलं होतं... आज  गुढी पाडवा या दिवसाला फार मोठं महत्त्व आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस म्हणून देखील मानला जातो.

असं म्हटलं जातं की, प्रभू रामचंद्रांनी चौदा वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतल्यावर लोकांकडून गुढी उभारून त्यांचे स्वागत केलं होतं... आज गुढी पाडवा या दिवसाला फार मोठं महत्त्व आहे. हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस म्हणून देखील मानला जातो.

2 / 5

सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंदू धर्मात शुभ दिवशी रांगोळी काढण्याती परंपरा आहे... त्यमुळे गुढी पाडव्याला तुम्ही देखील तुमच्या घरात सुंदर रांगोळी काढा... अनेक महिलांना रांगोळी काढायला प्रचंड आवडते... म्हणून ही डिझाईन तुम्हाला प्रचंड आवडेल.

3 / 5

गुढी पाडव्याच्या दिवशी दारात गुढी उभारली जाते. बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, कडुलिंब व आंब्याची पाने, फुलांचा हार आणि साखरेच्या गाठी बांधून त्यावर तांब्या उपडा ठेवून गुढी उभारतात... म्हणून गुढी भोवती देखील तुम्ही सुंदर रांगोळी काढू शकता...

4 / 5

भारतीय संस्कृतीत कायम सण आणि उत्साहांना अधिक महत्त्व असतं. गुढी पाडवा म्हणजे नव्या वर्षाची सुरुवात... उद्या गुढी पाडवा आहे. संपूर्ण भारतात सध्या गुढी पाडव्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. अशात दारात रांगोळी काढण्यासाठी फारसा वेळ पुरत नाही.

5 / 5

वेगवेगळे रंग वापरुन आकर्षक रांगोळी काढू शकता. फोटोंमध्ये दिसणाऱ्या रांगोळ्या तुम्ही 10 ते 15 मिनिटांमध्ये काढू शकता. इन्स्टाग्राम, इंटरनेट, यूट्यूबवर अनेक वेगळ्या प्रकरच्या रांगोळ्या असतात. ठिपक्यांच्या रांगोळ्यामुळे देखील वेळ जास्त लागत नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us