IPL 2024 आधी ‘या’ तगड्या संघाला मोठा झटका, ‘या’ स्टार खेळाडूचा अपघात
आयपीएल 2024 सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सर्व संघांचीरही तयारी झाली असून सर्व फ्रँचायसी आता आयपीएल सुरू होण्याची वाट पाहत आहेत. मात्र त्याआधी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्टार खेळाडूचा अपघात झाला आहे. कोण आहे तो खेळाडू जाणून घ्या.

Robin minz bike accident
- आयपीएलमधील तगडा संघ असलेल्या गुजरात टायटन्स संघाला मोठा झटका बसला आहे. आयपीएल सुरू होण्याआधी संघातील बड्या खेळाडूचा अपघात झाला आहे.
- गुजरात टायटन्स संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमी आधीच दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. हार्दिक पंडयाही यंदाा गुजरातचा कर्णधार नसणार आहे. शुबमन गिल याची गुजरातच्या कर्णधारपदी निवड केली आहे. मात्र स्पर्धा सुरू होण्या आधीच वाईट बातमी समोर आली आहे.
- अपघात झालेल्या खेळाडूला यंदा झालेल्या लिलावामध्येच गुजकरात संघाने आपल्या ताफ्यात घेतलं होतं. महत्त्वाचं म्हणजे चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद या खेळाडूंमध्ये संघर्ष पाहायला मिळाला होता.
- हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून रॉबिन मिन्झ आहे. गुजरातने त्याला 3.60 कोटींना खरेदी केलं होतं. रॉबिन याची सुपर बाईक दुसऱ्या दुचाकीला धडकली. या अपघातामध्ये त्याला सुदैवाने किरकोळ जखम झाली नाही. गाडीची अवस्था पाहाल तर सर्वांनाच धक्का बसला .
- दरम्यान, 22 मार्चपासून आयपीएल सुरू होत आहे. आताच गेल्या काही दिवसांपूर्वी शुबमन आणि रॉबिन मि्न्झ यांची विमानतळावर भेट झाली होती. रॉबिनचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. त्यावेळी गिलने त्यांच्यासोबत फोटो काढत आपल्या इन्स्टा स्टोरीला ठेवला होता.