विश्वासच बसणार नाही! ट्रकच्या मागे लिहिलेल्या ओळीवरून सुचलं हे आयकॉनिक गाणं; 21 वर्षांपासून आहे प्रत्येक पार्टीची शान

गुलजार यांच्या लेखणीतून साकारलेलं ‘कजरा रे’ गाणं आजही लोकप्रिय आहे. ‘बंटी और बबली’मधील या गाण्याने गुलजार यांनी त्यांच्या लेखनातील वेगळी बाजू दाखवली. विशेष म्हणजे, ऐश्वर्या राय, अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांच्या नृत्यामुळे हे गाणं अधिक चर्चेत आलं.

| Updated on: Sep 29, 2026 | 5:39 PM
1 / 5
कजरा रे गाण्याची खास गोष्ट म्हणजे,    2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’मध्ये ‘कजरा रे’ हे गाणं होतं. या गाण्याला अलीशा चिनाई, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी आवाज दिला. गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले असून संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिलं.

कजरा रे गाण्याची खास गोष्ट म्हणजे, 2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बंटी और बबली’मध्ये ‘कजरा रे’ हे गाणं होतं. या गाण्याला अलीशा चिनाई, शंकर महादेवन आणि जावेद अली यांनी आवाज दिला. गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले असून संगीत शंकर-एहसान-लॉय यांनी दिलं.

2 / 5

गुलजार यांनी या गाण्याच्या शब्दांमागची प्रेरणा सांगितली होती. त्यांच्या मते, “यह गाना मुख्य रूप से उन लाइनों से प्रेरित है जो उत्तर भारत में हाईवे पर तेजी से दौड़ते ट्रकों के पीछे लिखी होती हैं.” त्यामुळे गाण्याला वेगळा आणि मजेशीर अंदाज मिळाला.

3 / 5

गाण्यात कलाकारांचा जबरदस्त डान्स पहायला मिळतो. गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले. तिघांच्या नृत्यामुळे या गाण्याची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात वाढली. आजही अनेक पार्टी आणि कार्यक्रमांमध्ये हे गाणं ऐकायला मिळतं.

4 / 5

गुलजार यांचं खरं नाव संपूर्ण सिंह कालरा आहे. त्यांनी गीतकार, कवी, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अनेक क्षेत्रांत काम केलं. 1963 मध्ये ‘बंदिनी’मधील ‘मोरा गोरा अंग’ या गाण्यापासून त्यांच्या गीतलेखनाच्या प्रवासाला सुरुवात झाली.

5 / 5

गुलजार यांना पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या नावावर 5 राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि 21 फिल्मफेअर पुरस्कार आहेत. ‘साथिया’, ‘मकबूल’, ‘ओमकारा’, ‘हैदर’ यांसह अनेक चित्रपटांसाठी त्यांनी गाणी लिहिली आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us