
वैष्णवी हगवणे प्रकरणात पोलिसांकडून जप्तीचा धडाका सुरु केला आहे. त्यांनी वैष्णवीला लग्नात देण्यात आलेल्या तसेच सासऱ्यांकडे असलेल्या अनेक गोष्टी जप्त करण्यात आल्या आहेत.

वैष्णवीच्या कुटुंबाने दिलेली चांदीची भांडी ही पोलिसांनी जप्त केली आहेत.

तसेच हगवणे कुटुंबाकडे असलेले पिस्तूल आणि रिव्हॉल्व्हर देखील जप्त करण्यात आले.

हगवणेंकडे एंडेवर ही मोठी काळ्या रंगाची गाडी आहे. ही गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे.

वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबाने हगवणे कुटुंबावर अनेक गंभीर आरोप केलेले आहेत. या संपूर्ण प्रकरणात बावधन पोलिसांनी हगवणे कुटुंबावर गुन्हा दाखल करत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी 3 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहे.