हनुमान अंश चित्रपट 15 वेळा पाहिला, प्रत्येक वेळी… नीम करोली बाबांच्या मुलीने सांगितलं खास कारण
‘हनुमान अंश’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित काही आध्यात्मिक अनुभव निर्माती रागिनी सोना यांनी सांगितले. त्यांनी नीम करौली बाबा यांच्या कन्या गिरिजा जी अर्थात अम्मा जी यांची भेट घेतली होती. अम्मा जी यांनी चित्रपट पाहून दिलेल्या प्रतिक्रिया आणि रागिनी यांच्या कुटुंबाबद्दल सांगितलेल्या काही गोष्टींमुळे त्यांना हा अनुभव विशेष आणि आध्यात्मिक वाटला.

हनुमान अंश’ चित्रपटाने जगभरात 329.30 कोटी रुपयांची कमाई केल्याचे सांगितले जात आहे. या यशामुळे हा चित्रपट यंदाच्या चर्चेतील चित्रपटांपैकी एक ठरला आहे.
चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी निर्माती रागिनी सोना आणि दिग्दर्शक विशाल चतुर्वेदी यांनी गिरिजा जी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. चित्रपटासाठी त्यांचा आशीर्वाद मिळावा, अशी टीमची इच्छा होती
रागिनी यांच्या म्हणण्यानुसार, अम्मा जी यांनी ‘हनुमान अंश’ जवळपास 15 वेळा पाहिला आहे. प्रत्येक वेळी चित्रपट पाहताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले, असे रागिनी यांनी सांगितले.
रागिनी यांनी सांगितले की, अम्मा जींनी त्यांच्या वडिलांचे नाव आणि आग्रा येथील घराची जागा सांगितली. तसेच त्यांच्या मोठ्या भावाचे नावही त्यांनी सांगितल्याचा दावा रागिनी यांनी केला.
या संभाषणादरम्यान रागिनी भावूक झाल्या आणि अम्मा जींना ही माहिती कशी समजली, असा प्रश्न विचारला. या अनुभवामुळे आपण या चित्रपटाचा भाग होण्यासाठी निवडले गेल्याचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे रागिनी यांनी सांगितले.