Sania Mirza Birthday: मुंबईकर सानिया मिर्झाचा प्रेरणादायी प्रवास! ग्रँडस्लॅम चॅम्पियनचा थक्क करणारा प्रवास तुम्हाला माहितेय?
Happy Birthday Sania Mirza: भारतीय टेनिसला जागतिक स्तरावर नवी ओळख मिळवून देणारी सानिया मिर्झा आज (15 नोव्हेंबर) आपला 40 वा वाढदिवस साजरा करत आहे.

मुंबईत जन्म, हैदराबादमध्ये बालपण: सानिया मिर्झाचा जन्म 15 नोव्हेंबर 1986 रोजी मुंबईत झाला. तिचे वडील इम्रान मिर्झा क्रीडा पत्रकार, तर आई नसीमा या प्रिंटिंग व्यवसायाशी संबंधित होत्या. पुढे तिचे कुटुंब हैदराबादमध्ये स्थायिक झाले.
वयाच्या सहाव्या वर्षी हातात घेतली टेनिसची रॅकेट: सानियाला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने अवघ्या सहाव्या वर्षी टेनिसचे प्रशिक्षण सुरू केले. मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तिने अल्पावधीतच कनिष्ठ स्तरावर यश मिळवले.
ग्रँडस्लॅम जिंकून रचला इतिहास: 2003 मध्ये सानियाने व्यावसायिक टेनिसमध्ये पदार्पण केले. त्याच वर्षी विंबल्डन ज्युनियर डबल्सचे विजेतेपद पटकावत ती ऐतिहासिक कामगिरी करणारी पहिली भारतीय महिला ठरली. पुढे तिने एकूण सहा ग्रँडस्लॅम विजेतेपदे जिंकली.
जागतिक क्रमवारीत बनली नंबर वन: सानिया मिर्झा महिला दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला ठरली. एकेरीच्या क्रमवारीतही तिने टॉप 30 मध्ये स्थान मिळवले. तिच्या या कामगिरीमुळे भारतीय टेनिसला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली.
पद्मश्रीसह अनेक मानाचे पुरस्कार: क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी सानियाला अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आणि पद्मभूषण पुरस्कारांनी गौरवण्यात आले. तिच्या यशामुळे देशातील अनेक तरुणींना टेनिसमध्ये करिअर करण्याची प्रेरणा मिळाली.
वैयक्तिक आयुष्य आणि मुलगा इजहान: सानियाने 12 एप्रिल 2010 रोजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला. 2018 मध्ये त्यांना इजहान हा मुलगा झाला, मात्र 2023 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. सध्या सानिया दुबईत मुलगा इजहानसोबत राहते. अलीकडील एका मुलाखतीत तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने भाष्य केले.