मराठमोळा अभिनेता घटस्फोटीत मुस्लीम अभिनेत्रीच्या प्रेमात; फोटो पाहून तुम्हीही म्हणाला ‘हे तर सेम-सेम’
बॉलिवूडमध्ये अनेकदा काही कपल एकमेकांना गुपचुप डेट करताना पाहायला मिळतात. काही लोक डेटिंगचे फोटो शेअर करुन चाहत्यांना अपडेट देतात. तर काही लोक लपवून ठेवतात. अशातच आता बॉलिवूड अभिनेता आणि अभिनेत्री एकमेकांना डेट करत असल्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख एकत्र असल्याच्या चर्चा सुरू आहेत. हे कलाकार यापूर्वीही अनेकदा एकत्र दिसले आहेत. आता, त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टनंतर चाहते पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करत आहेत.

हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख यांनी काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पुण्यातील 'विंड्स ओव्हर वॉटर' येथील एका केबिनमधील आहेत. त्यांच्या पोस्टमध्ये काही साम्य आहे.

या पोस्ट एकाच ठिकाणच्या आहेत, जिथे ते काही शांत क्षण घालवत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, दोन्ही फोटो एकाच ठिकाणचे असल्याचे दिसत असले तरी, त्यात त्यांचे एकत्र असलेले फोटो नाहीत.

या फोटोंमुळे चाहत्यांमध्ये त्यांच्या नात्याबद्दल तर्कवितर्क सुरू झाले आहेत. चाहते त्यांच्या पोस्टवर ते एकमेकांना डेट करत असल्याचे म्हणत आहे. यापूर्वी हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

हर्षवर्धन राणे आणि संजीदा शेख यांनी दोन प्रोजेक्ट्समध्ये एकत्र काम केले आहे. ही जोडी 2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'ताइश' या अॅक्शन थ्रिलर चित्रपटात आणि 'कुन फया कुन' या थ्रिलर चित्रपटात एकत्र दिसली होती.