
महेंद्र सिंह धोनीचा फार्म हाऊस, रांची जवळील सीमालिया येथे आहे. त्याचे चाहते हा फार्म हाऊस दूरदूरून पाहण्यासाठी येतात. तर काही जण हा फार्महाऊस ऑनलाईन पाहतात.

धोनीचा हा फार्म हाऊसवर हिरवळ आहे. या ठिकाणी विविध झाडं आहेत. धोनही निसर्ग प्रेमी आहे.

धोनीचा फार्म हाऊसला लाल रंगाचे दरवाजा आहे. आता हा फर्म हाऊस रांचीची नवीन ओळख आहे. या ठिकाणी त्याचे चाहते बाहेरून का असेना सेल्फी घेतल्याशिवाय राहत नाही. हे एक पर्यटन स्थळ झाले आहे.

या फार्म हाऊसवर एक स्विमिंग पूल, जीम आणि धोनीच्या बाईकसाठी एक मोठे गॅरेज आहे. या फार्म हाऊसचे कौतुक तर विराट कोहलीने पण केले आहे.

कॅप्टन कुलला शांतता आवडते. त्यांच निसर्गावर प्रेम आहे. त्यामुळे त्याने शहरापासून दूर रिंग रोडच्या जवळ हे फार्म हाऊस तयार केले. येथे अनेकदा, त्याचे कुटुंबिय, मित्रांसोबत दिसतो.