
मराठी अभिनेत्री मिनाक्षी राठोड म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं मधली आपली सर्वांची लाडकी देवकी.

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत देवकीची भूमिका साकारणारी मिनाक्षी राठोडने ती गरोदर असल्याची बातमी सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांना दिली होती.

आई झाल्याची बातमी देखील मिनाक्षी ने सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली होती.

मीनाक्षी कधी आपल्या बाळाचे फोटो सोशल मीडियावर शेअकर करते याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली होती. फायनली मिनाक्षीने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर 'मुलगी झाली हो' असं कॅप्शन देत तिच्या गोड मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

मिनाक्षीचा नवरा कौलास वाघमारे यांनी देखील आपल्या गोंडस मुलीसोबत फोटो शेअर करत 'स्वागत नही करोगे हमारा?' असं कॅप्शन दिलं आहे

मिनाक्षीनं फोटो शेअर केल्यावर तिच्या चाहत्यांकडून फोटोवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू झाला आहे.