राजेशाही थाटात करा प्रवास, बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक मिनीव्हॅन
Electric Minivan | स्वीडनची प्रमुख वाहन निर्माता कंपनी व्होल्वो जगभरात सुरक्षित आणि आलिशान वाहन तयार करणारी म्हणून ओळखली जाते. या कंपनीने प्रवाशांसाठी एक खास आलिशान मिनीव्हॅन बाजारात आणली आहे. त्यामुळे मित्रमंडळी,कुटुंबियांसोबत तुम्हाला दूरची सफर अनुभवता येईल. अशी खास आहे ही इलेक्ट्रिक मिनीव्हॅन

स्वीडनच्या व्होल्वो या कंपनीने Volvo EM 90 ही खास इलेक्ट्रिक मिनीव्हॅन आणली आहे. ती रस्त्यावरुन धावणाऱ्या एखाद्या लिव्हिंग रुम सारखी असल्याचा फील येईल. यामध्ये एकापेक्षा एक आलिशान फीचर्स आणि नव तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.