
मिठाचे अति सेवन : तुम्ही जितके जास्त मीठ (Salt)खाल तितके तुमच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता निर्माण होते. मीठ हाडे कमकुवत (Weak bones)करण्याचे काम करते. तज्ज्ञांच्या मते जे लोक जास्त मीठ खातात त्यांना ऑस्टिओपोरोसिस होण्याचा धोका जास्त असतो.

कॉफी, चहाचे अधिक सेवन : चहा, कॉफी हे शरीरासाठी धोकादायक असते. त्याचा सर्वाधिक फटका हा हाडांना बसतो. कॉफीच्या अतिरिक्त सेवनामुळे हाडांमधून कॅल्शियमची गळती होते. त्यामुळे हाडांडी ताकद कमी होऊन ते ठिसूळ बनतात. त्यामुळे तज्ज्ञांकडून कॉफी किंवा चहाचे अधिक सेवन न करण्याचा सल्ला दिला जातो.

गोड पदार्थांचे अधिक सेवन : जर तुम्ही गोड पदार्थांचे अधिक सेवन करत असाल तर तुमचे वजन वाढण्याचा धोका असतो. त्याचा परिणाम हा तुमच्या हाडांवर होते. जास्त वजन असलेल्या लोकांना सांधेदुखीच्या समस्या इतरांपेक्षा अधिक असतात.

टोमॅटो आरोग्यासाठी चांगले असते पण अतिसेवणामुळे त्याचे दुष्परिणामही होतात.

अति मद्य पिणे : अति प्रमाणात मद्य आणि सोड्याचे सेवन देखील हाडांना हानिकारक आहे. यामुळे तुमची हाडे कमजोर होतात. हाडांची खनिज घनता कमी होते आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो.