Herbal Tea: हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी ‘या’ पाच हर्बल टीचे करा सेवन

| Updated on: Jan 24, 2022 | 10:10 PM

हिवाळ्यात सर्दी आणि फ्लूची समस्या सामान्य असते. हिवाळ्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. अशा परिस्थितीत तुम्ही अनेक प्रकारच्या हर्बल चहाचे सेवन करू शकता. आज आपण अशाच काही चहांच्या प्रकारांबाबत माहिती जाणून घेणार आहोत.

1 / 5
तुळशीचा चहा - आयुर्वेदात तुळशीला खूप फायदेशीर मानले जाते. तुळशीमध्ये  अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. ते फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून शरीराचे संरक्षण करतात. हिवाळ्यात तुम्ही तुळशीचा चहा पिऊ शकता. तुळशीच्या चहामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास आणि सर्दी सारख्या आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.

2 / 5
मुलेठीचा चहा : हिवाळ्यात तुम्ही मुलेठीच्या चहाचे सेवन करू शकता. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ते घसा खवखवणे आणि सर्दीसारख्या आजारापासून दूर ठेवण्यातस मदत करतात. जर तुमचा घसा दुखत असेल किंवा खवखवत असेल तर तुम्ही या चहाचे सेवन करू शकता. चांगल्या आवाजासाठी देखील मुलेठीचा चहा हा सर्वेत्तम आहे.

3 / 5
 कॅमोमाइल चहा - कॅमोमाइल चहा देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म तुम्हाला सर्दीपासून दूर ठेवतात. तसेच या चहाच्या नियमित सेवनामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.

4 / 5
ब्लॅक टी : ब्लॅक टी घेण्याचे देखील अनेक फायदे आहेत. ज्यांना पित्ताचा त्रास आहे, त्यांनी दुधाच्या  चहाऐवजी ब्लॅक टीचेच सेवन करावे. या चहामुळे हृदयाशी संबंधित आजार देखील दूर होतात.

5 / 5
आल्याचा चहा : आल्याचा चहा देखील अनेक आजारांवर रामबान इलाज आहे. आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात.आल्याच्या चहामुळे सर्दी, घसा खवखवणे, तसेच डोकेदुखीच्या त्रासापासून आराम मिळतो.