चर्चा तर होणारच ! मराठमोळ्या डोंबिवलीत हिंदी जाहिरात फलक, काय आहे मेसेज ?

मराठमोळ्या डोंबिवलीत हिंदी जाहिरात फलकाची जोरदार चर्चा; कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या फलकावर हिंदी जाहिरात झळकल्याने स्थानिक नागरिक, मराठीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते तीव्र नाराजी पसरली आहे. काय लिहीला आहे मेसेज ?

| Updated on: Apr 18, 2025 | 11:35 AM
1 / 5
कल्याण-डोंबिवली परिसरात मराठी आणि उत्तर भारतीय अस्मितेचा विषय पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.

2 / 5
यावेळी कारण ठरले आहे कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जाहिरात ठेकेदाराकडून लावण्यात आलेली हिंदी भाषेतील अधिकृत जाहिरात.

3 / 5
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या अधिकृत जाहिरात फलकावर हिंदी भाषेतील जाहिरात झळकली आहे, ज्यामुळे मराठमोळ्या डोंबिवलीकरांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे.

4 / 5
फलकावर असलेल्या जाहिरातीत “बाबूमोशाय, ऑफिस पास होना चाहिए लंबा नहीं” असा मजकूर असून या घोषवाक्याने मराठी बहुल डोंबिवलीत चर्चेला उधाण आले आहे.ही जाहिरात महापालिकेच्या ठेकेदाराने लावल्याचे स्पष्ट झाले आहे.

5 / 5
या घटनेमुळे भाषिक अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, यापूर्वीही डोंबिवलीत एका खाजगी संस्थेच्या गुजराती पाटीवरून वाद निर्माण झाला होता. आता महापालिकेच्याच अधिकृत फलकावर हिंदी वापरल्याने स्थानिक नागरिक, मराठीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते संतापले आहेत.