
ताराने तिच्या ट्रॉपिकल व्हेकेशनमधील एक जबरदस्त फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. पांढऱ्या रंगाच्या आऊटफीट घातला आहे .यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत आहे. या फोटोला तिने 'हॅपी ऍज अ क्लॅम' असे कॅप्शन दिले आहे.

ताराने स्विमिंग सूटमधील चाहत्यांना घायाळ करेल असा फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिने 'आयलँड बेबी' असे कॅप्शन या फोटोला दिले आहे. तिच्या या फोटोवर अनेक चाहत्यानी हॉट,हार्ट अश्या इमोजी टाकत कमेंट्स केल्या आहेत.

याबरोबरच तारा ने मालदीवमधील बीचवरील निळ्याशार समुद्राचा फोटोही शेअर केला आहे. यामध्ये तिने दीव इन असे म्हटले आहे. तारा सुतारियाही हिरोपंती- २ या चित्रपटात दिसणार आहे.

अहमद खान दिग्दर्शित हिरोपंती -२ या चित्रपटात टायगर श्रॉफ देखील मुख्य भूमिकेत आहे . या वर्षी 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

याशिवाय मालदीवच्या ट्रीपमध्ये तिने सी फूडचाही आनंद घेतला आहे. माझे आवडते जेवण सी फूड आणल्याबद्दल साध्वी तुझे खूपखूप आभार असे म्हटले आहे.