
आज होळी (Holi 2021) आणि धुळवडीच्या निमित्ताने सगळेच जण रंगात रंगलेले आहेत. अशावेळी मालिकांमध्येही होळी आणि धुळवडीच्या सणाचा जल्लोष पाहायला मिळणार आहे.

‘सहकुटुंब सहपरिवार’ मालिकेत होळीच्या सणाची धामधूम पाहायला मिळणार आहे. या जल्लोषात ढवळे मामी भांगेच्या नशेत अक्काच्या कारस्थानांचा पश्याकडे खुलासा करणार आहे. त्यामुळे होळीच्या जल्लोषासोबतच मालिकेत अक्काचा डाव उलटला जाणार आहे. अक्काच्या कारस्थानांपासून पश्या कुटुंबाचं रक्षण कसा करणार याची उत्सुकता असणार आहे.

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर गैरसमजांचं मळभ आलं आहे. होळीच्या निमित्ताने या दोघांमधले गैरसमज दूर होतील, असं वाटत असतानाच दोघांमधील दुरावा आणखी वाढला आहे. दीपा कार्तिकच्या नात्याचं भविष्य काय असेल, हे मालिकेच्या पुढील भागांमध्ये उलगडेलच पण या संपूर्ण टीमने जल्लोषात होळी साजरी केली आहे.

तुमच्या लाडक्या कलाकारांचा हा रोमँटिक अंदाज.

एकूणच कलाकारांनी सेटवर ही होळी मस्त साजरी केली आहे.