Chris Hemsworth: हॉलिवूडच्या ‘थॉर’ भारतावर आहे विशेष प्रेम, म्हणून मुलीचे नाव ठेवले ‘इंडिया’ ; काय भारतासोबतचे विशेष नाते

आपल्या दमदार अभिनयाने हॉलिवूड इंडस्ट्रीत उत्तम करिअर करणाऱ्या ख्रिसचे भारतातही खूप चाहते आहेत. अशा परिस्थितीत भारत हा त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीपासूनच महत्त्वाचा भाग राहिला आहे. हे बंध आणखी दृढ करण्यासाठी ख्रिसने आपल्या लाडक्या मुलीचे नावही 'इंडिया' ठेवले आहे.

| Updated on: Aug 11, 2022 | 1:04 PM
1 / 6
हॉलिवूडच्या प्रसिद्ध मार्व्हल फ्रँचायझी 'थॉर' मध्ये हातोड्याने सगळ्यांना नतमस्तक करणाऱ्या ख्रिस हेम्सवर्थला कुठल्याही नवीन ओळखीची गरज नाही. ख्रिस त्याच्या सुपरहिरो पात्रामुळे परदेशातच नाही तर भारतातही प्रसिद्ध आहे.

2 / 6
हॉलिवूड चित्रपटांचा हा सुपरस्टार आज 11 ऑगस्ट रोजी आपला 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. ख्रिसचा जन्म ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे 1983 साली झाला. ख्रिसचे भारतावरील प्रेम कुणापासून लपलेले नाही. तो केवळ भारतातच त्याचे चित्रपट प्रदर्शित करत नाही, तर ख्रिसवर भारताच्या संस्कृतीचाही खूप प्रभाव आहे.

3 / 6
आपल्या दमदार अभिनयाने हॉलिवूड इंडस्ट्रीत उत्तम करिअर करणाऱ्या ख्रिसचे भारतातही खूप चाहते आहेत. अशा परिस्थितीत भारत हा त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीपासूनच महत्त्वाचा भाग राहिला आहे. हे बंध आणखी दृढ करण्यासाठी ख्रिसने आपल्या लाडक्या मुलीचे नावही 'इंडिया' ठेवले आहे.

आपल्या दमदार अभिनयाने हॉलिवूड इंडस्ट्रीत उत्तम करिअर करणाऱ्या ख्रिसचे भारतातही खूप चाहते आहेत. अशा परिस्थितीत भारत हा त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीपासूनच महत्त्वाचा भाग राहिला आहे. हे बंध आणखी दृढ करण्यासाठी ख्रिसने आपल्या लाडक्या मुलीचे नावही 'इंडिया' ठेवले आहे.

4 / 6
लहानपणी गरिबीत वाढलेल्या ख्रिस हेम्सवर्थने ऑस्ट्रेलियन टीव्ही शो 'होम अँड अवे'मधून करिअरची सुरुवात केली. या शोमध्ये तो किम हाइडची भूमिका साकारताना दिसला होता, त्यानंतर त्याने कधीही मागे वळून  पहिले नाही. आज  तो एक यशस्वी आणि प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता म्हणून ओळखला जातो.

5 / 6
एका मुलाखतीत आपल्या मुलीच्या नावाबद्दल बोलताना ख्रिस म्हणाला, 'माझी पत्नी एल्सा पत्कीने भारतात बराच वेळ घालवला आहे. तिला भारत खूप आवडतो. एल्साला भारताची संस्कृती खूप आवडली आणि म्हणूनच मी माझ्या मुलीचे नाव इंडिया ठेवले. इतकेच नाही तर ख्रिस त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी अनेक वेळा भारतात आला आहे,आणि इथे त्याला  त्याला खूप प्रेम आणि आदर मिळाला आहे.

6 / 6
त्याची पत्नी एल्सा फास्ट फाइव्ह आणि फास्ट अँड फ्युरियस 6 मध्ये एलेना नेव्हसची भूमिका करण्यासाठी प्रसिद्ध आहे. इंडिया रोझ, साशा आणि ट्रिस्टन ही ख्रिसची मुले आहेत. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ख्रिसने त्याच्या करिअरमध्ये 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.ख्रिस हेम्सवर्थ हे तीन मुलांचे वडील आहेत. त्यांची पत्नी एल्सा पत्की एक स्पॅनिश मॉडेल, अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती  आहे.