Dhoni Retirement : IPL मधून संन्यास घेतलेला धोनी 1000 कोटींचा मालक कसा झाला? वाचा नेमकं सिक्रेट काय

धोनीची एकूण संपत्ती 1,060 ते 1,200 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. क्रिकेटमधील कमाईसोबतच जाहिराती, स्टार्टअपमधील गुंतवणूक आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून त्याने संपत्ती कमावलेली आहे.

| Updated on: Nov 17, 2026 | 5:38 PM
1 / 5
महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. तो चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून क्रिकेट खेळताना दिसणार नाही. त्याने आयपीएलमधून संन्यास घेतलेला असला तरीही तो चेन्नई संघाचा भाग असेल तो या संघाचा मेन्टॉर असणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतल्यानंतर त्याने उभारलेल्या 1000 कोटी मूल्य असलेल्या संपत्तीची चर्चा होत आहे.

महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमधून निवृत्ती घेतली आहे. तो चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून क्रिकेट खेळताना दिसणार नाही. त्याने आयपीएलमधून संन्यास घेतलेला असला तरीही तो चेन्नई संघाचा भाग असेल तो या संघाचा मेन्टॉर असणार आहे. दरम्यान, महेंद्रसिंह धोनीने संन्यास घेतल्यानंतर त्याने उभारलेल्या 1000 कोटी मूल्य असलेल्या संपत्तीची चर्चा होत आहे.

2 / 5

महेंद्रसिंह धोनीने 1000 कोटी रुपयांची संपत्ती कशी मिळवली, याबाबत विचारले जाते. विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीची एकूण संपत्ती 1,060 ते 1,200 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. क्रिकेटमधील कमाईसोबतच जाहिराती, स्टार्टअपमधील गुंतवणूक आणि विविध व्यवसायांच्या माध्यमातून त्याने संपत्ती कमावलेली आहे.

3 / 5

धोनीच्या उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) राहिलेला आहे. 2008 सालापासून तो चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वाचा खेळाडू राहिला आहे. त्याला आयपीएलच्या काही हंगामांमध्ये 15 कोटी रुपये मानधन मिळालं, तर 2022 ते 2024 या काळात 12 कोटी रुपयांमध्ये रिटेन करण्यात आलं होतं. आतापर्यंत IPL मधून त्याने सुमारे 196.65 कोटी रुपये कमावल्याचं सांगितलं जातं.

4 / 5

धोनीचे देशभरात कोट्यवधी फॅन्स आहेत. त्यामुळे अनेक ब्रँड्सच्या जाहिरातींमधूनही त्याने बरीच मोठी संपत्ती कमावलेली आहे. तो सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत नाही. पण अद्याप त्याची ब्रँड व्हॅल्यू कायम आहे. धोनीने अनेक स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केलेली आहे.

5 / 5

इलेक्ट्रिक मोबिलिटी, फिनटेक, ड्रोन टेक्नॉलॉजी, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी आणि अल्टरनेटिव्ह प्रोटीन यांसारख्या क्षेत्रांचा समावेश आहे. BluSmart, Khatabook, CARS24, Garuda Aerospace, Centricity, Rigi, EMotorad, Shaka Harry, 7Ink Brews, Tagda Raho आणि Run Adam या कंपन्यांमध्ये त्याने गुंतवणूक केल्याचं सांगितलं जातं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us