Petrol Tax : एक लीटर पेट्रोलमागे सरकार किती रुपये कमवते? जाणनू घ्या

युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. तुम्ही खरेदी करत असलेल्या एक लीटर पेट्रोलमागे सरकार किती रुपये कमवते, याबाबत तुम्हाला कल्पनाही नसेल.

| Updated on: Mar 22, 2026 | 7:49 PM
1 / 5
इस्त्रायल-इराण यांच्यातील युद्धामुळे भारतात इंधनाचा भाव वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी प्रिमियम पेट्रोलची किंमत 2 ते 2.35 रुपयांनी वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर सामान्य माणसाने एक लीटर पेट्रोलची खरेदी केल्यास सरकारच्या तिजोरीत किती रुपये जातात ते जाणून घेऊ या...

2 / 5

पेट्रोलची किंमत ही राज्य आणि केंद्र सरकारने लागू केलेल्या करानुसार ठरते. पेट्रोलच्या किमतीतील एकूण 40 ते 50 टक्के रक्कम ही सरकारच्या तिजोरीत जाते. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलमागे 94.77 रुपये हे थेट दिल्ली सरकारच्या तिजोरीत जातात.

3 / 5

केंद्र सरकार प्रत्येक एक लीटर पेट्रोलमागे 19.90 रुपये एक्साईज ट्यूटी वसूल करते. यात राज्य सरकार VAT च्या रुपात वेगळा कर आकारते. ही रक्कम प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी असते. दिल्लीमध्ये एक लीटर पेट्रोलमागे 15.39 रुपये VAT आकारला जातो.

4 / 5

या दोन्ही राज्यांचा कर मिळून एक लीटर पेट्रोलची किंमत ठरते. आकड्यात सांगायचे झाल्यास एक लीटर पेट्रोलमागे राज्य आणि केंद्र सरकार 35 ते 45 रुपये कमवते.

5 / 5

दुसरीकडे पेट्रोल पंपाच्या मालकांना प्रत्येकी एक लीटर पेट्रोलमागे 3.14 ते 4.43 रुपये मिळतात. म्हणजेच तुम्ही खरेदी करत असलेल्या एक लीटर पेट्रोलमागे बरेच पैसे हे सरकारच्या तिजोरीत जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us