
प्रेमानंद महाराज यांची प्रवचने ऐकायला अनेकांना आवडत असते. त्यांचे अनुयायी जगभरात आहेत. सध्या प्रेमानंद महाराज यांना चांगलीच प्रसिद्धी मिळत आहे.

एकदा एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना विचारले की महाराज तुमच्याकडे किती संपत्ती आहे. त्या भक्ताला महाराजांनी उत्तर दिले ते असे...

प्रसारमाध्यमातील बातम्यानुसार प्रेमानंद महाराज यांच्याकडे कोणतीही खाजगी मालमत्ता नाही.त्याच्याकडे कोणत्याही स्वरुपाची अचल संपत्ती नाही

जर कोणी माझ्याकडे दहा रुपये जरी मागत असेल तरी ते माझ्याकडे नसतात. ते संपूर्णपणे संन्यासी जीवन जगतात, त्यांच्याकडे कोणतीही संपत्ती नाही

एवढंच काय प्रेमानंद महाराज यांच्याकडे स्वत:चे घर देखील नाही. ते एका भक्ताच्या फ्लॅटमध्ये राहतात त्यांचा सांभाळ त्यांचे अनुयायी करीत असतात

प्रेमानंद महाराज म्हणतात की जेथे ते राहतात त्याचे वीजबिल देखील भक्तच भरतात, प्रेमानंद महाराज अनेकांना पायी पदयात्रा करताना दिसतात. परंतू काही वेळा ते ऑडी कारमध्ये बसलेले ही दिसतात

प्रेमानंद महाराज यांनी स्पष्ट केलेय की त्यांच्याकडे खाजगी कार देखील नाही.ही कार त्यांच्या सेवकांची आहे.जे ते प्रवास करताना वापरतात.

मिडिया रिपोर्टनुसार प्रेमानंद महाराजांकडे मोबाईल देखील नाही. त्यांना मोबाईल वापरता येत नाही.प्रेमानंद महाराज यांच्याकडे त्यांचे स्वत:चे बँक खातेही नाही

प्रेमानंद महाराज यांचे खरे नाव अनिरुद्ध पांडे आहे. त्यांचा जन्म १९६९ मध्ये कानपूरच्या सरसौल ब्लॉक अखरी गावात झाला.

प्रेमानंद यांच्या वडीलांचे नाव शंभू पांडे, आईचे नाव रामा देवी होते, ती धर्मरपारायणं करायची. प्रेमानंद महाराज लहानपणापासूनच अनेक देवतांचे चालीसा पाठ करायचे
